Dr Shaheen Shahid Arrested Saam
देश विदेश

Delhi Blast: 'जैश'च्या महिला विंगची चीफ निघाली डॉ. शाहीन, कारमध्ये ठेवायची AK-47, दिल्ली स्फोटापूर्वी अटक

Dr Shaheen Shahid Arrested: दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ भयंकर स्फोट झाला. या स्फोटापूर्वी ३ डॉक्टरांसह ७ जणांना अटक करण्यात आले होते. त्यामधील एक महिला डॉक्टर असून तिचा कनेक्शन जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेसोबत असल्याचे समोर आले आहे.

Priya More

Summary -

  • दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भयंकर स्फोट झाला

  • या स्फोटामुळे दिल्ली हादरली. यामध्ये १२ जणांचा मृत्यू धाला

  • या स्फोटापूर्वी ३ डॉक्टरांसह ७ जणांना अटक करण्यात आली होती

  • अटकेत असलेली महिला डॉक्टरचे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी कनेक्शन उघड

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण देश हादरला. तब्बल १४ वर्षांनंतर देशाची राजधानी दिल्ली स्फोटामुळे हादरली. या स्फोटानंतर संपूर्ण देशातील प्रमुख शहरांना अलर्ट देण्यात आला. दिल्लीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सर्वच ठिकाणी वाहनांची तपासणी, सीसीटीव्ही तपासले जात आङेत. या स्फोटामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचे म्हटले जात आहे कारण या स्फोटाचे कनेक्शन पाकिस्तानशी असल्याचे समोर येत आहे. फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलरशी देखील याचे कनेक्शन जोडले जात आहे. दिल्लीमध्ये स्फोट होण्यापूर्वी ३ डॉक्टरांसह ७ संशयितांना पोलिसांनी अटक केली. यामध्ये एक महिला डॉक्टर शाहीन शाहिदचा समावेश आहे. डॉक्टर शाहीनचा दहशतवादी संघटना जैश-ए मोहम्मदशी संबंध असल्याचे सांगितले जात आहे.

दिल्ली स्फोटानंतर करण्यात आलेल्या कारवाईत जैश-ए-मोहम्मद आणि अन्सार गजवत-उल-हिंदशी जोडलेल्या व्हाइट-कॉलर दहशतवादी मॉड्यूलचाही पर्दाफाश झाला. अटक करण्यात आलेल्या डॉक्टर शाहीनचे जैशशी थेट संबंध असल्याने ते उघडकीस येत आहे. असा दावा केला जात आहे की, शाहीनने जैशच्या महिला संघटनेच्या जमात उल मोमिनतच्या भारतातील प्रमुख म्हणून काम केले होते. तिचे ध्येय भारतातील दहशतवादी गटात शक्य तितक्या जास्त महिलांची भरती करणे हे होते.

डॉक्टर शाहीनच्या अटकेमुळे मोठा दहशतवादी कट उघड होण्याची शक्यता आहे. शाहीन ही लखनऊची रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये पसरलेल्या दहशतवादी मॉड्यूलमध्ये तिच्या संशयित भूमिकेसाठी तिला अटक करण्यात आली होती. अटक केलेल्या डॉक्टर शाहीनच्या कारमधून एके-४७ रायफल जप्त करण्यात आली आहे. ती जिथे जायची तिथे तिच्या कारमध्ये एके-४७ घेऊन जायची अशी माहिती देखील समोर आली आहे.

दिल्ली स्फोटानंतर फक्त डॉक्टर शाहीन नाही तर तिच्यासोबत वेगवेगळ्या भागातून आणखी ७ जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये फरीदाबादमध्ये राहणारा काश्मीरचा डॉक्टर मुझम्मिल गनी याचाही समावेश आहे. या कारवाईत २९०० किलो स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या पोलिस दलांसह केंद्रीय एजन्सींच्या संयुक्त कारवाईत हे मोठे यश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. लेडी डॉक्टर शाहीनला अटक करण्यात आली असून तिला चौकशीसाठी विमानाने श्रीनगरला आणण्यात आले.

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी संध्याकाळी ६.५५ वाजता एका कारमध्ये स्फोट झाला. लाल किल्ल्याच्या समोर अत्यंत गर्दीच्या ठिकाणी ही घटना झाली होती. या स्फोटामध्ये आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. या सर्वांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या स्फोटाचा संबंध फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी जोडला जात आहे. ज्यामध्ये स्फोटापूर्वी तीन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. या मॉड्यूलमध्ये सहभागी असलेला चौथा डॉक्टर मोहम्मद उमर असल्याचे म्हटले जात आहे. जो आय-२० कार स्फोटात मारला गेला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिस आणि एजन्सी सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - मुंबई महापालिका निवडणूकीसाठीच्या मतदारयादीसंदर्भात धक्कादायक माहिती समोर

Chhattisgarh Encounter : छत्तीसगडमध्ये मोठी कारवाई; एनकाउंटरमध्ये ५ नक्षलवाद्यांचा खात्मा, DRG जवान शहीद

Virat Kohli Century: विराट कोहलीचं सलग दुसरं शतक, गौतम गंभीरची रिअ‍ॅक्शन व्हायरल

Vasai-Virar: वसई-विरारमध्ये भाजपची ताकद वाढली, बड्या नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश

Glowing Skin Care Tips: दिवसभरच्या थकव्यामुळे चेहरा काळवंडलाय? या सोप्या टिप्स फॉलो करा

SCROLL FOR NEXT