Delhi Red Fort Car Blast Update : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ सोमवारी सायंकाळी एका धावत्या कारमध्ये मोठा स्फोट झाला. मेट्रो स्टेशन गेट नंबर 1 जवळ कारमध्ये स्फोट झालाय. या स्फोटानंतर परिसरातील इतर काही गाड्यांना आग लागलीय. या स्फोटात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. या स्फोटात काहीजण गंभीर जखमीही झाले आहे. आय २० कारमध्ये स्फोटके ठेवण्यात आली होती, असेही समोर आले आहे. या स्फोटाचा सुरक्षा यंत्रणाकडून तपास करण्यात येत आहे. कार कुणाच्या मालकीची होती? दिल्लीमध्ये कार कोण घेऊन आले? याचा शोध घेत असताना अतिशय महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दिल्ली ब्लास्टच्या आधीचे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेय. त्यामध्ये कारमध्ये दहशतवादी डॉ. उमर असल्याचे दिसतेय. तो तोंडावर काळा मास्क लावून कारमध्ये बसला होता.
दिल्ली ब्लास्टमध्ये वापरण्यात आलेल्या कारचे सीसीटीव्ही फुटेज तपास यंत्रणाच्या हातात आलेय. ब्लास्टच्या आधी I-20 कार गर्दीतून जात असल्याचे दिसतेय. कारच्या आतमध्ये चालक काळा मास्क घालून असल्याचे दिसते. तोच दहशतवादी मोहम्मद उमर असल्याचे सांगण्यात येतेय. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे पांढर्या रंगाची एक I20 कार त्या परिसरातून जात होती.
कार चालवणाऱ्याने आपला चेहरा काळ्या मास्कने झाकलेला होता. तपास यंत्रणा आता कार आणि मास्क घातलेल्या चालकाची ओळख पटविण्यासाठी एआयचाही वापर करत आहेत. हा व्यक्ती डॉ. उमर असल्याचे सूत्रांकडून समजतेय.
स्फोटासाठी वापरण्यात आलेली हुंडई आय२० कार मूळची मोहम्मद सलमान याची होती. पण त्याने ती नदीमला विकली होती. नदीमने नंतर ही कार फरीदाबादमधील वापरलेल्या कार डीलर रॉयल कार झोनला विकली. नंतर ती तारिकने आणि नंतर उमरने खरेदी केल्याचे समजतेय.
राजधानी दिल्ली सोमवारी रात्री कार ब्लासने हादरली. लाल किल्ल्याबाहेर झालेल्या कार बॉम्ब स्फोटाची आता संशयित दहशतवादी हल्ला म्हणून चौकशी केली जात आहे. ह्युंदाई आय२० कार स्फोटकांनी भरलेली होती आणि लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट क्रमांक १ जवळ जाणूनबुजून स्फोट घडवून आणण्यात आला होता, असे तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी सांगितलेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.