Gujarat ATS foils major terror attack planned using ricin poison : एरंडीच्या बियांपासून तयार केल्या जाणाऱ्या 'रिसिन' नामक विषाच्या माध्यमातून देशात भयंकर हल्ला करण्याचा एक कट एटीएसने उधळून लावला. गुजरात एटीएसच्या पथकाने भारतात अनेक ठिकाणी हल्ल्याची योजना आखणाऱ्या तीन दहशतवाद्यांना अटक करून मोठा कट उधळून लावला आहे. गुजरात एटीएसने दिलेल्या माहितीनुसार, 'अहमदाबादमधून या तिघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून दोन पिस्तूल आणि तीस जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत'. ही कारवाई देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठे यश मानले जात आहे. अटक करण्यात आलेले आरोपी देशातील विविध शहरांमध्ये दहशतवादी हल्ले करण्याची योजना आखत होते. या अटकेमुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत, ज्यामध्ये त्यांच्या आणखी साथीदारांचा शोध घेतला जात आहे. या कारवाईत चीनमध्ये एमबीबीएस केलेल्या एका डॉक्टरसह तिघांना अटक करण्यात आली आहे. या माध्यमातून एका संशयित दहशतवादी सिंडिकेटचा पर्दाफाश झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.