Red Fort blast : दिल्ली किल्ल्याजवळ कारमध्ये ब्लास्ट, मृताची अन् जखमींची नावे समोर

Full list of dead and injured in Delhi Red Fort blast : दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट झाला. या घटनेत ११ जणांचा मृत्यू, तर अनेकजण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेश, हिमाचल, उत्तराखंडमधील अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
Delhi red fort blast news
Delhi red fort blast :Saam tv
Published On

Delhi Red Fort Blast: राजधानी दिल्लीमधील ऐतिहासिक लाल किल्ला सोमवारी रात्री हादरला. धावत्या कारमध्ये ब्लास्ट झाला अन् एकच खळबळ उडाली. कारच्या स्फोटानंतर आजूबाजूच्या गाड्यांनीही पेट घेतला अन् क्षणात एकच गोंधळ उडाला. आरडाओरड अन् धावपळीने परिसर हादरून गेला. या स्फोटात ११ जणांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण गंभीर जखमी आहेत. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंडमधील अनेकांचा या दुर्घटनेत मृत्यू झालाय.

राजधानी दिल्लीमधील ब्लास्टमध्ये मृत अन् जखमींची नावे समोर आलेली आहेत. त्यामध्ये अमरोहामधील जगवंश सिंह, उत्तर प्रदेशमधील देवरियामधील तरूणाचाही मृत्यू झालाय. त्याशिवाय दिल्ली, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील अनेकांचा या दुर्देवी स्फोटात मृत्यू झालाय. पोलिसांकडून स्फोट झालेल्या आय २० कारचा शोध घेतला जातोय. ही कार कुणाच्या नावावर आहे? याचाही शोध घेतला जातोय. या हल्ल्यानंतर मुंबई, महाराष्ट्रासह देशभरातली अनेक शहरात हायअलर्ट जारी केला आहे.

Delhi red fort blast news
Delhi Car Blast : मोठी बातमी! दिल्ली ब्लास्टचे पुलवामा कनेक्शन समोर, कार मालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

दुर्घटनेतील जखमींवर दिल्लीमधील लोकनायक जयप्रकाश (LNJP) रूग्णालयात उपचार सुरू आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी रूग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि राहुल गांधी यांच्यासह अनेकांनी या घटनेबाबात दुख आणि खेद व्यक्त केला आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेबाबत चौकशी करण्यात येत आहे. संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून चौकशी करण्यात येत आहे. स्फोटात अनेक कुटुंबाचा आधार हरवलाय. दुर्घटनेतील मृत आणि जखमींची नावे समोर आली आहेत.

Delhi red fort blast news
Delhi Car Blast : ब्लास्टच्या आधीचे CCTV फुटेज समोर, दहशतवादी डॉक्टर उमर झाला स्पॉट, काळ्या मास्कने....

मृत आणि जखमींची नावे

शायना परवीन मोहम्मद, दिल्ली (जखमी)

हर्षुल सेठी, उत्तराखंड (जखमी)

शिवा जायसवाल उत्तर प्रदेश (जखमी)

समीर दिल्ली - (जखमी)

जोगिंदर दिल्ली (जखमी)

भवानी शंकर सहरमा , दिल्ली (जखमी)

अज्ञात (मृत)

गीता शिव प्रसाद , दिल्ली (जखमी)

विनय पाठक, दिल्ली (जखमी)

पप्पू दूधवी, उत्तर प्रदेश (जखमी)

विनोद विशाल सिंह, दिल्ली (जखमी)

शिवम झा , दिल्ली (जखमी)

अज्ञात (अमान) (जखमी)

मोहम्मद शहनवाज , दिल्ली (जखमी)

अंकुश शर्मा, शाहदरा (जखमी)

अशोक कुमार, अमरोहा (उत्तर प्रदेश) (मृत)

अज्ञात- (मृत)

मोहम्मद फारुख , दिल्ली (जखमी)

तिलक राज, हिमाचल प्रदेश (जखमी)

अज्ञात (जखमी)

अज्ञात ( मृत)

अज्ञात ( मृत)

अज्ञात (मृत)

मोहम्मद सफवान , दिल्ली (जखमी)

अज्ञात (जखमी)

मोहम्मद दाऊद , गाज़ियाबाद (जखमी)

किशोरी लाल दिल्ली (जखमी)

आज़ाद रसूलुद्दीन, दिल्ली (जखमी)

Delhi red fort blast news
Delhi Bomb Blast : पार्किंगमध्ये कार ३ तास, ६.२२ ला निघाली, यू-टर्न घेतला अन्.. राजधानीत नेमकं काय काय घडलं?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com