Delhi car Blast Live updates : दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट

Delhi Red Fort car Blast Live Update : राजधानी दिल्लीमध्ये लाल किल्याजवळ एका कारमध्ये ब्लास्ट झाला. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झालाय, तर अनेकजण जखमी झाले आहेत. दिल्ली ब्लास्टनंतर देशभरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दिल्ली ब्लास्ट संदर्भातील सर्व लाईव्ह अपडेट्स
Delhi Blast Live updates :
Delhi Blast Live updates :

दिल्लीत आत्मघातकी हल्ला! i20 कारमध्ये ठेवण्यात आली स्फोटकं | Delhi Blast At Red Fort

पुणे शहरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट

दिल्लीतील स्फोटाच्या घटनेनंतर पुणे शहरातील सुरक्षा यंत्रणा हाय अलर्ट

शहरातील महत्त्वाच्या संवेदनशील ठिकाणी हालचालींवर लक्ष

दिल्ली घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्तांनी ही सर्व पोलीस ठाण्यांना सतर्क राहण्याचा दिल्या सूचना

शहरातील रेल्वे स्टेशन बस स्थानके मॉल सिनेमा थेटर धार्मिक स्थळे गर्दीच्या भागांमध्ये पोलीसगस्ट वाढवला

Delhi Red Fort car Blast Live Update : दिल्लीतील बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर पुणे शहरातही सुरक्षा यंत्रणांकडून 'हाय अलर्ट' जाहीर

पुणे शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष

दिल्लीतील घटनेनंतर महाराष्ट्र पोलिस मुख्यालयाकडून सर्व जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनीही सर्व पोलिस ठाण्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शहरातील रेल्वे स्टेशन, बसस्थानके, विमानतळ, मॉल्स, सिनेमा थिएटर्स, धार्मिक स्थळे आणि गर्दीच्या भागांमध्ये पोलिस गस्त वाढवण्यात आली आहे.

पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरा बाहेरील सुरक्षाही वाढवण्यात आली

Delhi car Blast Live updates : दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळांना विशेष अलर्ट

दिल्ली येथे झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील धार्मिक स्थळे व गर्दीच्या ठिकाणांना विशेष अलर्ट देण्यात आला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर देशभरात प्रसिद्ध असलेल्या शेगाव येथील संत गजानन महाराज मंदिर परिसरातही पोलिसांनी विशेष खबरदारी घेत छावणीचा स्वरूप दिलेला आहे प्रत्येक भाविकाची मेटल डिटेक्टर च्या माध्यमातून तपासणी करून आज सोडण्यात येत आहे तर मंदिर परिसरात शीघ्रकृतिदल व पोलिसांचा मोठा पहारा लावण्यात आलेला आहे या ठिकाणी सशस्त्र पोलीसही नेमण्यात आले आहे.

दिल्लीतील स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलिसांचा अलर्ट मोड, स्टेशन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू

दिल्ली येथे झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर कल्याण पोलीस सतर्क झाले असून शहरात सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर ठेवण्यात आली आहे. कल्याण रेल्वे स्टेशन तसेच परिसरातील संवेदनशील ठिकाणी पोलिसांनी सर्च ऑपरेशन राबवले आहे.

कल्याण पोलीस दलाकडून स्टेशन परिसर, बसस्थानक, बाजारपेठ, हॉटेल्स, लॉज आणि गर्दीच्या ठिकाणांची कसून तपासणी करण्यात येत आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून वाहने आणि संशयास्पद व्यक्तींची काटेकोर चौकशी केली जात आहे.

Delhi Red Fort car Blast Live Update : पिंपरी चिंचवडमध्ये हायअलर्ट

दिल्ली बॉम्ब ब्लास्ट नंतर पिंपरी चिंचवड शहर पोलिस हाय अलर्ट वर आहेत. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या वतीने शहरात ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त आणि नाका बंदी लावण्यात आली आहे. तसेच महामार्गावरून आणि रस्त्यावरून ये जा करणाऱ्या चार चाकी वाहनांची पोलीस कसून तपासणी करत आहेत.

Delhi Red Fort car Blast Live Update : अजनी रेल्वे स्थानकावर हायलर्ट

कारपासून पार्किंगच्या संपूर्ण परिसर मेटल डिटेक्टरने सामान्यांची तपासणी केली जात आहे. डॉग्सस्कॉडकडून सामानाची प्रवाशांचे तपासणी केली जातेय. रेल्वेगाड्यातही तपासणी केली जात आहे. लोहमार्ग पोलिसांनी 30 अतिरिक्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या बंदोबस्त लावला असून दोन बीडीएस कोड असे एकूण 45 जवानांच्या बंदोबस्त रात्रीपासून लावला आहे.

Delhi Red Fort car Blast Live Update : नागपूरमध्ये कठोर सुरक्षा

नागपूरमधील मुख्य रेल्वे स्थानकावर जीआरपी आणि आरपीएफकडून सुरक्षा व्यवस्था अलर्ट मोडवर आहे. बॉम्बस्फोट पथक, डॉग्स कोड पथकाकडून तपासणी केल्या जात आहे. येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांवर आणि संवेदशील व्यक्तींवर नजर ठेवली जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com