Delhi Car Blast : मोठी बातमी! दिल्ली ब्लास्टचे पुलवामा कनेक्शन समोर, कार मालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Delhi car blast Pulwama connection : दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार स्फोटाच्या तपासात पुलवामा कनेक्शन समोर आलं आहे. स्फोटात वापरण्यात आलेली आय२० कार अनेक वेळा विकली गेली होती आणि त्यात बनावट कागदपत्रांचा वापर झाला होता. पोलिसांनी कार मालकाला ताब्यात घेतलं असून, तपास यंत्रणांकडून पुढील चौकशी सुरू आहे.
Red Fort explosion
Delhi bomb blastsaam tv
Published On

Delhi car Blast At Red Fort Update News : राजधानी दिल्लीमध्ये सोमवारी सायंकाळी झालेल्या कार ब्लास्टने देश हादरला. आय २० कारमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके होती, हल्ल्यात ११ जणांना जीव गमावावा लागलाय. तपास यंत्रणाकडून या स्फोटाचा तपास केला जातोय. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून काढले आहेत. त्याशिवाय करच्या क्रमांकावरून कारच्या मालकाला ताब्यात घेतले आहे. राजधानी दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी तपास यंत्रणांनी ४ जणांना ताब्यात घेतले असून चौकशी करण्यात येत आहे. (Red Fort I20 blast linked to Pulwama resident Tariq)

कारच्या खरेदी विक्रीत बनावट कागदपत्रांचा वापर -

दिल्ली कार बॉम्बस्फोटांच्या तपासात एक अतिशय गंभीर आणि खळबळजनक खुलासा झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या हुंडई आय-20 कारमध्ये स्फोट झाला होता ती अनेक वेळा विकली गेली होती... त्याचे पुलवामा कनेक्शन देखील समोर येत आहे... या स्फोटात 11 जणांचा मृत्यू झाला आणि 30 जण जखमी झाले आहेत. स्फोटात वापरण्यात आलेली आय-२० कार अनेक वेळा खरेदी-विक्री करण्यात आल्याचे तपास यंत्रणांना तपासात आढळून आले आहे.

Red Fort explosion
Delhi Car Blast : ब्लास्टच्या आधीचे CCTV फुटेज समोर, दहशतवादी डॉक्टर उमर झाला स्पॉट, काळ्या मास्कने....

सर्वात चिंताजनक बाब म्हणजे ती पुलवामा येथील रहिवासी तारिकला विकण्यात आली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कारच्या खरेदी-विक्रीमध्ये बनावट कागदपत्रांचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला होता, ज्यामुळे कारच्या खऱ्या मालकाची ओळख अद्याप पटलेली नाही. या फसवणुकीमुळे स्फोटाच्या कटात सहभागी असलेल्यांच्या हेतूंबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होतात..

Red Fort explosion
Gujarat ATS : एरंडीच्या बियांपासून विष अन् मोठा कट, गुजरातमधून ३ दहशतवाद्यांना अटक

कार मालकाला बेड्या -

दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाला कार ब्लास्ट प्रकरणातत अनेक महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.. जे सूचित करतात की हा आत्मघाती हल्ला असू शकतो. ही कार हरियाणातील गुरुग्राम उत्तर रेल्वे स्टेशनवर नोंदणीकृत होती. तिचा क्रमांक, HR 26 7624, मोहम्मद सलमान नावाच्या व्यक्तीचा आहे, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आणि चौकशी केली. सलमानने चौकशीवेळी कार कुणाला विकली, याबाबतची माहिती दिली. त्याने सांगितले की, ही कार जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथील रहिवासी तारिक नावाच्या व्यक्तीला विकली होती...तारिकला जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तारीकने ही का उमर याला विकल्याचे तपासात समोर आले आहे.

Red Fort explosion
देशात मोठ्या घातपाताचा कट उधळला, डॉक्टराच्या घरातून 300 किलो RDX, एके ४७ अन्...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com