Car crashes through bridge railing and drowns in Buxar Ganga 
देश विदेश

Accident : पुलाचे कठडे तोडून कार नदीत कोसळली; ५ जणांचा दुदैवी अंत

Car crashes through bridge railing and drowns in Buxar Ganga : बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीवरील पुलावरून स्कॉर्पिओ कार कोसळून पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. कार कठड्याला धडकून थेट नदीत गेली. प्रशासनाकडून रात्रीपासून बचावकार्य सुरू असून, काही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.

Namdeo Kumbhar (नामदेव कुंभार)

Scorpio falls into Ganga River in Bihar, 5 people feared dead : बिहारमधील बक्सरमध्ये गंगा नदीवर अपघाताची भयंकर घटना घडली. नदीवरील पुलाचे कठडे तोडून भरधाव वेगात आलेली स्कार्पियो कार थेट नदीमध्ये कोसळळी. कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री वीर कुंवर सिंह पुलावर ही अपघाताची घटना घडली. गंगा नदीवर रात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. कारमधील एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून इतरांचा शोध घेतला जात आहे.

बिहारहून उत्तर प्रदेशच्या दिशेने जाणारी स्कॉर्पिओ कार शुक्रवारी रात्री गंगा नदीवरील पुलाच्या कठड्याला धडकून नदीत कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली. ही घटना शुक्रवारी रात्री ८:३० च्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षदर्शींनुसार, या कारमध्ये पाच ते सहा जण होते. परंतु कारमध्ये नेमके किती प्रवासी होते याची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. तसेच, हे प्रवासी कोठून येत होते याबाबतही माहिती समजू शकलेली नाही.

बक्सरमधील अपघाताची माहिती मिळताच प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले आहे. स्थानिकांच्या मदतीने गंगा नदीत बुडालेल्या स्कॉर्पिओचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अपघातामधील एका व्यक्तीचा मृतदेह मिळाला आहे. इतरांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, याआधी महाराष्ट्रातील रत्नागिरीजवळील खेड येथे मुंबई-गोवा महामार्गावरील जगबुडी नदीच्या पुलावरून एका भरधाव कार १००-१५० फूट खाली कोसळली होती. त्या दुर्घटनेत पाच जणांचा जागीच मृत्यू झाला होता.

पोलिसांच्या माहितीनुसार, बेपत्ता व्यक्ती सापडल्यानंतरच मृतांच्या संख्येबाबत अचूक माहिती मिळू शकेल. दुल्हपूर गावात या घटनेची माहिती देण्यात आली आहे. सध्या, बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. घटनेनंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. बचाव कार्यात विविध पथके कार्यरत आहेत. पोलिस बेपत्ता व्यक्तींना लवकरात लवकर शोधण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: पुण्यात भयंकर घडलं! धरण परिसरात आढळला अज्ञाताचा मृतदेह, रात्री तरंगताना पाहून नागरिक भयभीत

Mobile Full Form: मोबाईलचा फुल फॉर्म काय?

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मराठा आंदोलकांनी रस्त्यावर कबड्डी खेळत वेधून घेतले लक्ष

Maharashtra Live News Update: सातपुडा पर्वत रांगेत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती नदी दुथडी वाहू लागली

Maratha Protest: आंदोलन दडपण्यासाठी सरकारकडून अमानुष डावपेच? मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा आरोप|VIDEO

SCROLL FOR NEXT