Water metro train Update News in Marathi : मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. कारण, महाराष्ट्र सरकार मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करणार आहे. कोचीच्या धर्तीवर मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्यावर सरकारनं काम सुरू केले आहे. मंत्री नितेश राणे यांच्याकडून या प्रोजेक्ट्सबाबत दुजोरा देण्यात आला आहे. वॉटर मेट्रो मुंबईमध्ये १० मार्गावर धावेल, यादरम्यान २९ स्थानकं असतील, असे समजतेय.
वॉटर मेट्रो सुरू झाल्यानंतर मुंबईकरांना वाहतूक कोंडीमधून दिलासा मिळेल. ऑफिसमध्ये ये जा करण्यास वॉटर मेट्रोचा वापर होमार आहे. मुंबईतील वॉटर मेट्रोसाठीच्या सर्वेक्षणाची जबाबदारी कोटी मेट्रो रेल लिमिटेडकडे दिली होती. हा सर्वेक्षणाचा रिपोर्ट मंत्री राणेंच्या टेबलावरपोहचला आहे. पुढील तीन ते चार महिन्यात महाराष्ट्र सरकारकडून वॉटर मेट्रोच्या निर्मितीसंदर्भात आराखडा तयार करेल. त्यासाठीची पूर्वतयारी सुरू करण्यात आली आहे.
कोच्ची मेट्रोने मुंबईमध्ये वॉटर मेट्रो सुरू करण्याबाबतचं सर्वेक्षण करून रिपोर्ट मंत्री राणेंकडे सुपूर्द करण्यात आला आहे. त्यामध्ये मुंबईसाठी २९ टर्मिनल तयार करण्याबाबतचा सल्ला देण्यात आला आहे. त्याशिवाय ही वॉटर मेट्रो दहा मार्गावर चालवावी, असेही सांगण्यात आलेय. या प्रकल्पात जेटी टर्मिनलवर प्रवाशांसाठी सुविधा, बोट खरेदी आणि इतर सुविधांचा समावेश असेल. या प्रोजेक्टवर २,५०० कोटी रुपये खर्च होण्याचा अंदाज आहे. वॉटर मेट्रोमुळे मुंबईत प्रवासाचा वेळ वाचेल. लवकरच मुंबईकरांच्या सेवेसाठी वॉटर मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे.
मुंबईमध्ये वाहतुकीसाठी आणि प्रवासासाठी वॉटर मेट्रो हा एक चांगला पर्याय ठरेल. याचं काम लवकरात लवकर सुरू होण्याची शक्यता असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. एमएमबी (Maharashtra Maritime Board) अध्यक्ष राणे यांच्याकडून दोन ते तीन महिन्यात या प्रोजेक्टबाबत राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला जाणार आहे. त्यानंतर राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यास प्रत्यक्षात कामाला (When will Mumbai Water Metro start?) सुरूवात होणार आहे. या प्रोजेक्ट्समुळे मुंबईकरांना लोकलमधील गर्दी आणि रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका मिळणार आहे. मुंबईतील वॉटर मेट्रोच्या प्रोजेक्ट्सचे काम कोची मेट्रो रेल लिमिटेडला मिळण्याची शक्यता आहे.
मंत्री नितेश राणे यांच्याकडून मुंबईतील जलवाहतुकीवर जोर दिला जात आहे. ते म्हणाले की, वांद्रे, वरळी, वर्सोवा, दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई यांसारख्या भागात वॉटर मेट्रोसाठी अनेक संधी आहेत. रस्ते निवडताना ज्या मार्गांवर जास्त प्रवासी असतील आणि फायदा होईल अशा मार्गांना प्राधान्य द्यावे. तिकीट दरही सर्वसामान्यांना परवडतील असे ठेवावेत.
उत्तर मुंबई ते दक्षिण मुंबई आणि नवी मुंबई ते दक्षिण मुंबई यासाठी वॉटर मेट्रो हा चांगला पर्याय असेल. हा प्रकल्प प्रवास सुलभ करेल आणि मुंबईच्या वाहतूक समस्येला कमी करण्यास मदत करेल. मुंबईकरांसाठी हे आधुनिक, स्वस्त आणि जलद वाहतूक साधन ठरेल, असे राणे यांनी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.