School Closed : रायगडमध्ये शाळा-कॉलेजला सुट्टी, आज अतिवृष्टीचा धडकी भरवणारा इशारा

Heavy Rain Batters Raigad: रायगड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा तडाखा सुरूच आहे. हवामान विभागाने आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) दिला असून, कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
Raigad Rain: रायगडमध्ये जोर'धार';  शाळा,महाविद्यालयांना सुट्टी
Schools and colleges in Raigad shut as heavy rain floods five talukas; Kundalika river above danger markHT
Published On

Raigad on Orange Alert, Schools and Colleges Closed : मागील चार दिवसांमध्ये कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाने धुमाकूळ घातला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. आजही कोकणात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. रायगडमध्येही आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मागील दोन दिवसांपासून पडत असलेल्या संततधारेमुळे नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. जिकडे तिकडे पाणीच पाणी साठले आहे, त्यामुळे रायगडमधील पाच तालुक्यामधील शाळांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे पत्रक जारी केले आहे.

हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर व कुंडलिका नदीने (Kundalika river crosses warning level) इशारा पातळी ओलांडल्यामुळे आज रायगड जिल्ह्यातील अलिबाग,रोहा,तळा,महाड,पोलादपूर तालुक्यांतील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. रायगडमध्ये आज हवामान विभागाने अति मुसळधार पावसाचा इशारा (Orange alert issued in Raigad as torrential rain floods major talukas) दिला आहे. मागील दोन दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसामुळे रायगडमध्ये जिकडे तिकडे पाणीच पाणी झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर पूर्व तयारी म्हणून रायगडमधील शाळा आणि कॉलेजला सुट्टी देण्यात आली आहे.

Raigad Rain: रायगडमध्ये जोर'धार';  शाळा,महाविद्यालयांना सुट्टी
Maharashtra Weather : मुंबईसाठी ४ तास महत्त्वाचे, पुण्यालाही अतिमुसळधारेचा इशारा, वाचा हवामानाचा आजचा अंदाज

रायगडला अतिवृष्टीचा इशारा

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार आज रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आलेला होता. रायगड जिल्ह्यामध्ये रात्रभर अलिबाग, तळा, रोहा, महाड, पोलादपूर या भागात अतिमुसळधार पाऊस झाल्यामुळे, सद्यस्थितीत वादळी वाऱ्यासह सुरु असलेला पाऊस व समुद्रास असणाऱ्या भरतीमुळे कुंडलिका या नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. वरील सर्व बाबी तसेच तहसिलदार अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर यांच्या अहवालाचे अवलोकन करता अलिबाग, रोहा, तळा, महाड, पोलादपूर या तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालये यांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. अंगणवाडी, सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

Raigad Rain: रायगडमध्ये जोर'धार';  शाळा,महाविद्यालयांना सुट्टी
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ८ गाड्यांचा विचित्र अपघात, कैद्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला जबर धडक

रायगडमधील धरणांतील पाणी साठ्यात मोठी वाढ

मे आणि जून महिन्यात झालेल्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे, जिल्ह्यातील लघुपाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 28 प्रकल्पामध्ये 60 टक्के पाणी साठा जमा झाला आहे. तर जिल्ह्यातील सुतारवाडी, उन्हेरे, पाभरे, संदेरी खिंडवाडी, भिलवले, कोंडगाव, कोथुर्डे आणि खैरेही 9 धरणे पूर्ण क्षमतेनी भरली आहेत. फणसाड आणि वावा ही धरणेही लवकरच ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.

Raigad Rain: रायगडमध्ये जोर'धार';  शाळा,महाविद्यालयांना सुट्टी
Beed : बीडमध्ये बँकेच्या गेटवरच बापाची आत्महत्या, मुलीच्या लग्नाचे स्वप्न उध्वस्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com