FASTag संदर्भात मोठी घोषणा, ₹३००० मध्ये वार्षिक पास, वाचा कधीपासून सुरू होणार

FASTag annual pass ₹3000 plan Check Details : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी FASTag वापरकर्त्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. १५ ऑगस्ट २०२५ पासून खासगी कार, जीप, व्हॅन यांसारख्या गैर-व्यावसायिक वाहनांसाठी ₹3000 मध्ये FASTag चा वार्षिक पास उपलब्ध होणार आहे.
FASTag annual pass ₹3000 plan
Nitin Gadkari announces new ₹3000 FASTag annual pass valid for 200 trips from August 15, 2025Saam TV News Marathi
Published On

Need to know all about FASTag annual pass ₹3000 plan : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी FASTag संदर्भात ऐतिहासिक घोषणा केली आहे. FASTag चा आता वार्षिक पास मिळणार असल्याची घोषणा करण्यात आली. १५ ऑगस्ट २०२५ पासून देशभरात फक्त ३ हजार रूपयात FASTag चा वार्षिक पास मिळणार (Nitin Gadkari Introduces ₹3000 FASTag Pass) आहे. हा पास खासगी गैर-व्यावसायिक वाहनांसाठी (जसे की कार, जीप, व्हॅन) उपलब्ध असेल. यामुळे राष्ट्रीय महामार्गांवरील टोल नाक्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होण्याची शक्यता आहे. यामध्ये एक वर्षानंतर २०० यात्रांवर हा पास वर्षभर वैध असणार आहे. लाखो वाहनधारकांना या पासचा फायदा होणार आहे. शिवाय पैसे भरण्यासाठी लागलेल्या लांब रांगांपासूनही सुटका मिळणार आहे.

पासची वैधता किती? सुविधा काय मिळणार? What is the validity of FASTag pass? What are the benefits?

हा FASTag वार्षिक पास अॅक्टिव्ह झालेल्या दिवसापासून एक वर्ष किंवा 200 फेऱ्यापर्यंत, (Benefits of the new FASTag plan announced by Nitin Gadkari for 200 trips) यापैकी जे आधी असेल, त्या कालावधीसाठी वैध असेल. यामुळे विशेषतः 60 किलोमीटर परिघात राहणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे. ज्यांना सध्या वारंवार टोल भरण्याच्या कटकटीला सामोरे जावे लागते, त्यांना फायदा होणार आहे. वार्षिक पासमुळे टोल नाक्यावरील गर्दी कमी होईल.

FASTag annual pass ₹3000 plan
मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ८ गाड्यांचा विचित्र अपघात, कैद्यांना घेऊन जाणाऱ्या वाहनाला जबर धडक

वार्षिक पाससाठी कुठे करावा अर्ज? प्रोसेस काय आहे? Where to apply for an FASTag annual pass? What is the process?

हा FASTag पास लवकरच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) आणि रस्ते वाहतूक मंत्रालय (MoRTH) च्या अधिकृत वेबसाइट्सवर (How to apply for FASTag annual pass through NHAI or Highway Travel App) तसेच महामार्ग प्रवास ॲपवर एक स्वतंत्र लिंक उपलब्ध करून दिले जाईल. ही प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल आणि वापरकर्त्यासाठी सोपी असेल, ज्यामुळे वाहनचालकांना कोणत्याही अडचणीशिवाय पास मिळवता येईल. (₹3000 FASTag plan from August 15, 2025 to reduce toll plaza congestion)

FASTag annual pass ₹3000 plan
Beed : बीडमध्ये बँकेच्या गेटवरच बापाची आत्महत्या, मुलीच्या लग्नाचे स्वप्न उध्वस्त

नितीन गडकरी काय म्हणाले ? What did Nitin Gadkari say about FASTag ?

हा FASTag उपक्रम टोल संकलन प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुलभता आणण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. या धोरणामुळे लाखो वाहनचालकांना जलद आणि तणावमुक्त प्रवासाचा अनुभव मिळेल. विशेषतः नियमित प्रवास करणाऱ्या खासगी वाहनचालकांसाठी हा पास अत्यंत फायदेशीर ठरेल, असे नितीन गडकरी म्हणाले.

FASTag annual pass ₹3000 plan
Maharashtra Weather : अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा, राज्यात पाऊस धो धो कोसळणार; कोकण, घाटमाथ्यावर मुसळधारेचा इशारा

FASTag वार्षिक पासचा फायदा काय होणार ? What will be the benefit of FASTag Annual pass?

टोल नाक्यावर रांगेत थांबण्याची गरज कमी होईल.

एकाच व्यवहारात टोल भरण्याची सुविधा असल्यामुळे टोल नाक्यावरील गर्दी कमी करेल.

टोल भरण्याशी संबंधित वाद कमी होऊन प्रक्रिया सुलभ होईल.

देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवर अखंड प्रवासाचा अनुभव मिळेल.

वार्षिक पास संदर्भातील अधिक माहितीसाठी NHAI च्या अधिकृत वेबसाइट किंवा महामार्ग प्रवास ॲपला भेट द्या.

FASTag annual pass ₹3000 plan
मोठी बातमी! ५० नव्या नमो भारत ट्रेन धावणार, रेल्वे मंत्र्यांची घोषणा, अमृत भारत ट्रेनबाबतही मोठं विधान

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com