Amravati Shock: ठाकरेंच्या शिवसैनिकाची आत्महत्या, शेवटच्या चिठ्ठीत ४ जणांचा उल्लेख

Amravati Gopal Rane suicide case latest police update : अमरावतीतील राठी नगरमध्ये कृषी बाजार समितीचे माजी संचालक गोपाल राणे यांनी अतिक्रमण आणि मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. चिठ्ठीत चार जणांवर गंभीर आरोप असून, पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
Shiv Sena leader Gopal Rane suicide in Amravati
Farmer Leader Gopal Rane Dies by Suicide in Amravati; Suicide Note Mentions Four Accused Over Land EncroachmentSaam TV News marathi
Published On

अमर गटारे, अमरावती प्रतिनिधी

Shiv Sena leader Gopal Rane suicide in Amravati : अमरावती जिल्ह्यातील राठीनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसहकार सेनेचे जिल्हाध्यक्ष गोपाल राणे यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे. शेतावरील अतिक्रमण आणि मानसिक त्रासाला कंटाळून राणे यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. राणे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत चार जणांचा उल्लेख करण्यात आला आह. त्यांच्या शेतावर अतिक्रमण करून मानसिक त्रास दिल्याचा गंभीर आरोप शेवटच्या चिठ्ठीमध्ये केला आहे. या चिठ्ठीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

५६ वर्षीय गोपाल बाबासाहेब राणे यांनी मानसिक त्रासाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. गुरूवारी ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पत्नी घराबाहेर गेल्यानंतर राणे यांनी टोकाचा निर्णय घेतला. गोपाळ राणे यांच्या मृत्यू बातमी समजताच अमरावतीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राणे यांच्या आत्महत्याचेही माहिती मिळताच गाडगेनगर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेतला असून पोस्टमार्टमासाठी पाठवला आहे. राणे यांच्याजवळ सुसाईड नोट सापडली. त्यामध्ये चार जणांकडून मानसिक त्रास होत असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.

Shiv Sena leader Gopal Rane suicide in Amravati
पुणे– सातारा आता सुसाट जा, रेल्वेच्या दुहेरीकरणातील अतिशय महत्त्वाचा टप्पा पूर्ण

गोपाल राणे हे शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते म्हणून अमरावती आणि राठी नगरमध्ये परिचित होते. त्यांच्या शेतावर काही व्यक्तींनी बेकायदा अतिक्रमण केल्याने त्यांना प्रचंड मानसिक त्रास सहन करावा लागला, असा दावा त्यांच्या चिठ्ठीत आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, शेतकऱ्यांच्या जमिनींवरील अतिक्रमणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, आरोपींच्या विरोधात कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. स्थानिक शेतकरी संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी या घटनेचा निषेध व्यक्त करत सरकारकडून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

Shiv Sena leader Gopal Rane suicide in Amravati
Mumbai Water Metro : नवी मुंबईतून थेट दक्षिण मुंबईत, मुंबईकरांच्या सेवेत येणार वॉटर मेट्रो, २९ स्थानकं अन् १० मार्ग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com