"Cyberattack halts check-in and boarding at major European airports; passengers stranded." saam Tv
देश विदेश

Cyberattack On Airports: विमानतळांवर सायबर हल्ला; चेक-इन आणि बोर्डिंग सेवा ठप्प;UK-बेल्जियमसह युरोपच्या फ्लाइट रद्द

Cyberattack Hits Major European Airports : लंडनमधील हीथ्रो, ब्रुसेल्स आणि बर्लिनसह प्रमुख युरोपीय विमानतळांवर सायबर हल्ला झालाय. कॉलिन्स एरोस्पेस सॉफ्टवेअरवर झालेल्या सायबर हल्ल्यामुळे विमानतळांवरील चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टीमवर परिणाम झाला.

Bharat Jadhav

  • युरोपातील हीथ्रो, ब्रुसेल्स आणि बर्लिन विमानतळांवर मोठा सायबर हल्ला झाला.

  • कॉलिन्स एअरस्पेसच्या सॉफ्टवेअरवर हॅकिंग झाल्यानं चेक-इन आणि बोर्डिंग सेवा ठप्प झाल्या.

  • पॅरिसच्या रॉईसी, ऑर्ली आणि ले बोर्जेट विमानतळांवर कोणतीही समस्या आली नाही

युरोपातील अनेक प्रमुख विमानतळांवर सायबर हल्ले झाले. लंडनमधील हीथ्रो, बेल्जियममधील ब्रुसेल्स आणि जर्मनीतील बर्लिनसह अनेक विमानतळावर हा हल्ला झाला. हा सायबर हल्ला चेक-इन आणि बोर्डिंग सिस्टीमशी संबंधित सेवा प्रदान करणारी कंपनी कॉलिन्स एअरस्पेसवर झाला. या हल्ल्यामुळे चेक-इन आणि बोर्डिंगवर परिणाम झाला.

या सायबर हल्ल्यामुळे अनेक उड्डाणे रद्द झाली आहेत, तर अनेक उड्डाणे उशिरा सुरू झालीत. या हल्ल्यामुळे हजारो प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. युरोपमधील अनेक विमानतळांनी प्रवाशांना त्यांच्या विमानाची स्थिती तपासण्याचा सल्ला दिलाय. ब्रुसेल्स विमानतळाने एका निवेदनात म्हटलं की, हल्ल्यामुळे फक्त मॅन्युअल चेक-इन आणि बोर्डिंग करता येत होतं.

प्रवासी हाताळणी प्रणालीसाठी सेवा प्रदात्यावरही हल्ला करण्यात आला, ज्यामुळे विमानतळ चालकांना ही प्रणाली डिस्कनेक्ट करावी लागल्याचं, बर्लिनच्या ब्रँडनबर्ग विमानतळावरील अधिकाऱ्यांनी सांगितले. सायबर हल्ल्याचा परिणाम फक्त काही विमानतळांवरच जाणवला. पॅरिसच्या रॉईसी, ऑर्ली आणि ले बोर्जेट विमानतळांवर कोणतीही समस्या आली नाही, असं फ्रान्सने सांगितलं.

कुठे-कुठे हल्ला झाला?

कोलिन्स एरोस्पेस, एक अमेरिकन विमान वाहतूक आणि संरक्षण तंत्रज्ञान कंपनीवर सायबर हल्ला झाला. ही कंपनी आरटीएक्स कॉर्पची उपकंपनी आहे. या कंपनीला आधी रेथिऑन टेक्नॉलॉजीज म्हटलं जात होतं. कंपनीने म्हटलं की, ते प्रवाशांना थेट चेक-इनची सुविधा देत नाही, परंतु असे तंत्रज्ञान विकसित करते जे प्रवाशांना किओस्क मशीनवर स्वतः चेक-इन करण्याची, बोर्डिंग पास आणि बॅग टॅग प्रिंट करण्याची आणि स्वतःचे सामान स्वतः पाठवून शकतात.

पुढे बोलताना कंपनीने सांगितलं की, "आम्हाला निवडक विमानतळांवर आमच्या MUSE सॉफ्टवेअरमध्ये सायबर समस्येची जाणीव झालीय. याचा परिणाम फक्त इलेक्ट्रॉनिक चेक-इन आणि बॅगेज कलेक्शनवर झालाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CIDCO Lottery 2025: '३५ लाखांचं घरं ७५ लाखाला विकतात', सीडकोबाबत RTI मधून धक्कादायक माहिती उघड

Mahesh Manjrekar: आज शिवाजी महाराज असते तर...; महेश मांजरेकरांसह 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाचे कलाकार साई चरणी नतमस्तक

Surya Gochar Luck: सूर्य तूळ राशीत करणार मार्गक्रमण, मिथुन, सिंहसह आणखी एक रास होणार मालामाल

Jalgaon : धरणात पोहण्यासाठी उतरणे जीवावर बेतले; तरुणाचा बुडून मृत्यू

Silver Rate Prediction: सोन्यापेक्षा चांदीनं केलं मालामाल! १० महिन्यात ₹९०,००० वाढ, आता खरेदी करणे योग्य का?

SCROLL FOR NEXT