
भारत सरकारने डिजिटल इंडिया अंतर्गत ई-पासपोर्ट योजना सुरू केलीय.
या पासपोर्टमध्ये RFID चिप आणि बायोमेट्रिक माहिती साठवलेली आहे.
आंतरराष्ट्रीय ICAO मानकांनुसार हा पासपोर्ट जागतिक स्तरावर मान्य आहे.
भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं प्रवाशी कागदपत्राना आधुनिक आणि सुरक्षित बनवण्यासाठी एक क्रांतीकारी निर्णय घेतलाय. परराष्ट्र मंत्रालयानं ई-पासपोर्टची सुविधा सुरू केलीय.एप्रिल २०२४ मध्ये पायलट प्रोजेक्टच्या रुपात ही योजना सध्या सुरू करण्यात आली होती. आता देशातील अनेक राज्यातही योजना सुरू झालीय. ही योजना जूनच्या महिन्यापासून औपचारिक रुपानं देशात सुरू केली जाणार आहे.
हे पासपोर्ट दिसण्यास संपूर्णपणे पारंपारिक भारतीय पासपोर्ट सारखं आहे. परंतु हे पूर्णपणे आधुनिक आहे. या पासपोर्टच्या कव्हला एक RFID चिप आणि अॅन्टिना लावलेला असतो. यात पासपोर्टधारकाची बायोमेट्रिक माहिती असते, म्हणजेच फिंगरप्रिंट आणि डिजिटल फोटो सुरक्षित राहतात. यामुळे पासपोर्टची डुप्लिकेट कॉपी बनवणं अशक्य आहे.
पासपोर्टच्या कव्हरवर "पासपोर्ट" या शब्दाखाली सोनेरी चिन्ह आहे, यामुळे ते सहज ओळखता येते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, हा पासपोर्ट आंतरराष्ट्रीय आयसीएओ मानकांचे पालन करणारे आहे, यामुळे ते जगभरात ओळखले जाते.
सुरुवातीला ही सुविधा फक्त चेन्नई, हैदराबाद, भुवनेश्वर, सुरत, नागपूर, गोवा, जम्मू, शिमला, रायपूर, अमृतसर, जयपूर, रांची आणि दिल्ली येथील पासपोर्ट सेवा केंद्रांवर उपलब्ध होती. परंतु आता हे पासपोर्ट सेवा प्रोग्राम २.० च्या अंतर्गत देशभरात लागू केलं गेले आहे. दरम्यान सर्व केंद्रांवर हे पासपोर्ट मिळण्याची सुविधा एकाचवेळी सुरू होणार नाही. परंतु नागरिक या पासपोर्टसाठी अर्ज करू शकतात. तसेच त्यांच्याकडे असलेलं जुने पासपोर्ट बदलण्याची त्यांनी घाई करून नये.
ई-पासपोर्ट हे साधारण नेहमीच पासपोर्टसारखेच आहे. कोणताही भारतीय नागरिक ई-पासपोर्टसाठी अर्ज करून शकतात. अर्ज करण्यासाठी ओळखपत्र, रहिवासी दाखला, जन्म दाखला ही कागदपत्र लागतात. यासह पासपोर्ट सेवा केंद्रात जाऊन अर्जदाराला आपली बायोमेट्रिक पडताळणी करणं अनिवार्य आहे.
पासपोर्ट सेवा पोर्टलला भेट द्या. तेथे नोंदणी/लॉगिन करा.
ऑनलाइन अर्ज फॉर्म भरा आणि जवळच्या पासपोर्ट सेवा केंद्राची निवड करा.
निर्धारित शुल्क ऑनलाइन भरा आणि अपॉइंटमेंट बुक करा.
आवश्यक कागदपत्रांसह नियोजित तारखेला केंद्रावर जा.
पडताळणी आणि बायोमेट्रिक कॅप्चर केल्यानंतर, ई-पासपोर्ट जारी केला जाईल.
सरकारच्या अनुसार,ई-पासपोर्टमुळे प्रवाशांना लाभ होईल. पासपोर्टवर चिप असल्यानं बनवाट पासपोर्ट बनवणं शक्य नाही. विमानतळावर इमिग्रेनशन प्रक्रिया जलद गतीने होत असते. विशेषकरून त्या देशात ऑटोमेटेड ई-गेट्स् आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.