Mumbai Local Train: पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत, लोकल २० मिनिटे उशिराने

Mumbai Local Train: अंधेरी स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. गाड्या सरासरी १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.
Mumbai Local Train
"Western Railway disruption at Andheri: Mumbai local trains delayed by 20 minutes, commuters face inconvenience."saam tv
Published On
Summary
  • अंधेरी स्थानकातील तांत्रिक बिघाडामुळे पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली.

  • अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवरील गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

  • रेल्वे प्रशासनाने तातडीने दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे.

मुंबईकरांची लाईफ लाईन पश्चिम रेल्वे वाहतूक विस्कळीत झालीय. अंधेरी स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकल गाड्या उशिराने धावत आहेत. या बिघाडामुळे अप व डाऊन दोन्ही मार्गांवरील लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झालाय.

मुंबईकरांची लाईफ लाईन असलेल्या पश्चिम रेल्वे मार्गावरील अंधेरी स्थानकात पॉईंट फेल्युअर झालीय अप व डाऊन दोन्ही मार्गांवरील लोकल गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. या बिघाडामुळे गाड्या १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. रेल्वे प्रशासनाने तांत्रिक दुरुस्तीचे काम तातडीने सुरू केले असून प्रवाशांची गैरसोय कमी करण्यासाठी विशेष लक्ष देण्यात येत आहे. दरम्यान, प्रवाशांना धीर धरण्याचे आणि प्रवासाला अतिरिक्त वेळ राखून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com