Congress leaders protest inside the assembly premises after MLA Rajendra Bharti’s disqualification in Madhya Pradesh. Saam tv
देश विदेश

फक्त आमदारकी रद्द करण्यासाठी रात्री 10.30 वाजता सुरु केलं सचिवालय, काँग्रेसच्या बड्या नेत्यावर कारवाई! नेमकं काय घडलं?

Congress MLA Disqualified After Conviction: काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांची कोर्टाच्या शिक्षेनंतर आमदारकी रद्द करण्यात आली. रात्री उशिरा विधानसभा सचिवालय उघडल्याने राजकारणात मोठा वाद निर्माण झाला असून काँग्रेसने भाजपवर गंभीर आरोप केले आहेत.

Omkar Sonawane

मध्यप्रदेशच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून काँग्रेसचे आमदार राजेंद्र भारती यांची विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. 27 वर्षांपूर्वीच्या एफडी घोटाळ्याच्या प्रकरणात त्यांना कोर्टाने दोषी ठरवले असून त्यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने भारती यांना दोन कलमांखाली तीन वर्षे आणि एका कलमाखाली दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. सहआरोपी, माजी बँक लिपिक रघुवीर शरण प्रजापती यांनाही तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

न्यायालयाने आमदारांना जामीन मंजूर केला आणि उच्च न्यायालयात अपील करण्यासाठी ६० दिवसांची मुदत दिली. दोन वर्षांहून अधिक शिक्षेच्या न्यायालयाच्या निर्णयानंतर दातियाचे आमदार राजेंद्र भारती यांची सदस्यताही रद्द करण्यात आले आहे. रात्री १०:३० वाजता विधानसभा सचिवालय सुरू झाले आणि त्यानंतर थोड्याच वेळात, विधानसभा सचिवालयाने सदस्यता रद्द करण्याचा आदेश जारी केला.

यामुळे काँग्रेस पक्षाला मोठा हादरा बसला. ही माहिती मिळताच काँग्रेसचे अनेक नेते हे विधानभवनात दाखल झाले. यावेळी विधानसभा प्रधान सचिव अरविंद शर्मा आणि इतर अधिकारी कार्यालयात होते.काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी हे थेट प्रधान सचिव शर्मा यांच्या दालनात गेले. आमदार भारती यांच्या प्रकरणावर न्यायालयाची स्थगिती असून त्यांचे सदस्यत्व आता रद्द केले जाऊ शकत नाही.

भाजपच्या सांगण्यावरून सचिवालय रात्री उघडण्यात आले - पटवारी

प्रदेश काँग्रेस अध्यक्ष पटवारी म्हणाले, आमदार भारती यांचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी भाजपच्या सांगण्यावरून विधानसभा सचिवालय रात्रीच्या वेळी उघडण्यात आले.आम्ही भाजपच्या राजकीय गुंडगिरीचा आणि विधानसभा सचिवालयाच्या गैरवापराचा तीव्र निषेध करतो. काँग्रेस या राजकीय द्वेषाचा पूर्ण ताकदीनिशी सामना करेल. असे पटवारी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: झाडूसारखे केस १५ मिनिटात होतील शायनी आणि सॉफ्ट; आठवड्यातून एकदा लावा हा हेअर मास्क

Maharashtra News Live Update: सोलापूर जिल्ह्यातील भोंदूबाबा मनोहर भोसलेला दिलासा नाही, 2 मेपर्यंत पोलिस कोठडीत वाढ

Aadhaar Card Update : आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा नाही!

Wednesday Horoscope: कोर्ट कचेरीच्या कामातून होणार सुटका, अचानक धनलाभाचा योग; जाणून घ्या तुमचं भविष्य

Skin care: रोजच्या कामामुळे स्किन केअरसाठी वेळ मिळत नाही? 5 मिनिटांत करा हे काम चेहरा होईल ग्लोईंग आणि सॉफ्ट

SCROLL FOR NEXT