Shruti Vilas Kadam
पास्ता – 1 कप, कांदा – 1 (बारीक चिरलेला), टोमॅटो – 1 (बारीक चिरलेला), शिमला मिरची – 1/2 कप (चिरलेली), स्वीट कॉर्न – 1/2 कप, लसूण – 4-5 पाकळ्या (बारीक चिरलेल्या), तेल किंवा बटर – 2 टेबलस्पून, टोमॅटो सॉस / व्हाईट सॉस – 1/2 कप, मीठ – चवीनुसार, मिरपूड – 1/2 टीस्पून, ओरेगॅनो / मिक्स हर्ब्स – 1 टीस्पून, चीज – 2 टेबलस्पून (ऐच्छिक)
एका भांड्यात पाणी उकळवा, त्यात मीठ आणि थोडंसं तेल घालून पास्ता मऊ होईपर्यंत शिजवा.
कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, कॉर्न यांसारख्या भाज्या बारीक चिरून घ्या.
पॅनमध्ये थोडं तेल किंवा बटर गरम करून त्यात लसूण आणि कांदा परतून घ्या.
त्यात चिरलेल्या भाज्या घालून २-३ मिनिटं शिजवा, जेणेकरून त्या क्रंची राहतील.
टोमॅटो सॉस किंवा व्हाईट सॉस घालून चवीनुसार मीठ, मिरपूड आणि हर्ब्स टाका.
उकडलेला पास्ता या मिश्रणात घालून नीट हलवा, जेणेकरून सॉस सगळीकडे लागेल.
वरून चीज किंवा कोथिंबीर घालून गरमागरम पास्ता सर्व्ह करा.