तामिळनाडूमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे. विरुधुनगरचे खासदार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिकम टागोर यांनी पक्षाच्या तामिळनाडू निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील जागावाटपावर ते नाराज होते आणि त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त आहे.
काँग्रेसने सत्ताधारी डीएमकेसोबत युती करून तामिळनाडू विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या युतीमुळे काँग्रेसला केवळ २८ जागा मिळाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या १८ विद्यमान जागांपैकी दोन जागा डीएमकेने घेतल्या आहेत.
तसेच एआयएडीएमकेचे पारंपरिक सात जागा काँग्रेसला देण्यात आल्या आहेत, ज्यामुळे या जागा जिंकणे काँग्रेस पक्षासाठी अत्यंत आव्हानात्मक बनले आहे. सूत्रांच्या मते, मणिकम हे डीएमके युतीमध्ये काँग्रेस पक्षासाठी अधिक जागा आणि सत्तेत वाटा मिळावा अशी बऱ्याच काळापासून मागणी करत होते. कॉँग्रेस पक्षाला कमी जागा आल्याने ते नाराज होते. त्यांनी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपला राजीनामा सादर केला. ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कॉँग्रेसच्या खासदाराने राजीनामा दिल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. तामिळनाडू विधानसभासाठी २३ एप्रिल रोजी मतदान पार पडणार आहे.
२०२६ च्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी मतदान गुरुवार, २३ एप्रिल, २०२६ रोजी होणार आहे. राज्यभरात सकाळी ७:०० ते सायंकाळी ६:०० या वेळेत एकाच टप्प्यात मतदान होईल. तर मतमोजणी ४ मे, २०२६ रोजी होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.