Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

Marathi Breaking Live Marathi Headlines Updates : राज्यात काही ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस, राजकीय घडामोडी, पेट्रोल-डिझेलची बचत करा, विदर्भाला उन्हाचा तडाखा, राज्यातील आणि देशातील महत्त्वाचे अपडेट्स वाचा एका क्लिकवर...
Maharashtra News Live Update:
Maharashtra News Live Update:Saam TV Marathi news
Published On

Nashik: नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे आमदार रोहित पवार यांचा दौरा

मालेगाव-नाशिक

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे आमदार रोहित पवार यांचा दौरा

डोंगराळे येथील अत्याचारानंतर हत्या झालेल्या साडेतीन वर्षांच्या चिमुकलीच्या कुटुंबियांची घेतली भेट

कुटुंबियांचे सांत्वन करत प्रकरणाची सविस्तर माहिती जाणून घेतली

यावेळी खासदार भास्कर भगरे हेही उपस्थित होते

डोंगराळे प्रकरणाबाबत रोहित पवार यांनी कुटुंबियांसोबत जवळपास तासभर चर्चा केली

न्यायालयीन प्रक्रियेमधील त्रुटी शोधून आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाहीही यावेळी देण्यात आली

Pune: नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

पुणे -

नीट पेपरफुटी प्रकरणातील पालकांवर सीबीआयचे लक्ष

मोठी रक्कम परत मिळवण्यासाठी काही पालकांनी फोडलेले पेपर इतर पालकांना विकल्याचा तपास यंत्रणांना संशय

पेपर मिळवण्यासाठी राज्यातील अनेक पालकांनी १० ते २५ लाख रुपये मोजले असल्याचे तपासातून समोर

एवढी मोठी रक्कम देऊन पेपर खरेदी केल्यानंतर पालकांनी इतर काही पालकांना ते हस्तांतरित केल्याचा संशय

पुणे, लातूर, नांदेड आणि आसपासच्या जिल्ह्यांमध्य एका नेटवर्कद्वारे रॅकेट चालवले जात असल्याचा संशय

येत्या काही दिवसात ठिकठिकाणी सी बी आय कडून कारवाईची शक्यता

Amravati: आमदार बच्चू कडू यांना विदर्भात पक्ष वाढीसाठी मोठी जबाबदारी

अमरावती -

शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विधानपरिषदेचे आमदार बच्चू कडू यांना विदर्भात पक्ष वाढीसाठी मोठी जबाबदारी

आमदार बच्चू कडू यांची शिवसेना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेते पदी केली नियुक्ती .....

बच्चू कडूंना विदर्भात शिवसेना पक्षाच संघटन,शाखा बांधणी व पक्ष वाढीसाठी ही जबाबदारी दिल्याचे बोलल्या जात आहे....

Ahilyanagar: अहिल्यानगर जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या चाऱ्याची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास प्रतिबंध

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यात उत्पादित होणारा हिरवा व कोरडा चारा, मुरघास आणि टोटल मिक्स राशन (टी.एम.आर.) यांची इतर जिल्ह्यांत वाहतूक करण्यास मनाई करणारा आदेश जारी केला आहे. पुढील दोन महिन्यांसाठी हा आदेश लागू राहणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया यांनी हे आदेश काढले आहेत.

pune : शिवराज मोटेगावकरने पेपर स्वतःच्या मुलासाठी फोडला? 

शिवराज मोटेगावकर ने पेपर स्वतःच्या मुलासाठी फोडला? अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मोटेगावकरच्या मुलाने ३ मे रोजी झालेली नीट ची परीक्षा दिली असल्याची माहिती

कोचिंग क्लास चालवत असला तरी मोटेगावकर ने मुलासाठी प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी धरला होता आग्रह?

Shivsena : शिवसेनेकडून आमदार बच्चू कडू यांच्याकडे मोठी जबाबदारी 

शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विधानपरिषदेचे आमदार बच्चू कडू यांना विदर्भात पक्ष वाढीसाठी मोठी जबाबदारी

आमदार बच्चू कडू यांची शिवसेना पक्षाच्या विदर्भ विभागीय नेते पदी केली नियुक्ती .....

बच्चू कडूंना विदर्भात शिवसेना पक्षाच संघटन,शाखा बांधणी व पक्ष वाढीसाठी ही जबाबदारी दिल्याचे बोलल्या जात आहे.....

Kalyan : नीलम गोर्हे कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल

रेल्वे स्थानकात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार प्रकरण

विधानसभेचे उपसभापती नीलम गोर्हे कल्याण जीआरपी पोलीस ठाण्यात दाखल

घडलेल्या प्रकरणाची पोलिसांकडून घेत आहेत माहिती

malegaon : मालेगावात अपर जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या बैठकीत गोंधळ

- मालेगावात अपर जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांच्या बैठकीत गोंधळ झाला.

- वर्षानुवर्ष मोसम नदीत रक्त मिश्रीत सोडले जात असल्याच्या विषयावर होती संबंधित विभाग आणि सामाजिक कार्यकर्ते आणि याचिकाकर्ते यांची बैठक...

- बैठक on कॅमेरा आणि माध्यमांच्या प्रतिनिधींना मज्जाव केल्याने झाला गोंधळ..

- बैठकीत अपर जिल्हाधिकारी यांच्याकडून पत्रकारांना मज्जाव केल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी निषेध करीत सोडली बैठक..

- - बैठकीत मिडियाला मज्जाव केल्याने सामाजिक कार्यकर्त्यांनी केला निषेध..

- जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने आयोजित करण्यात आली होती बैठक..

Akola : अकोल्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा

अकोला जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागातर्फे आज '18 मे ते 23 मे' यादरम्यान अकोला, तसेच विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. त्यानुसार आवश्यक दक्षता घेण्याबाबत आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Mumbai : मुंबईची तहान भागवणाऱ्या शहापूरमध्ये पाण्यासाठी पायपीट 

मुंबईची तहान भागवणाऱ्या आणि धरणांचा तालुका म्हणून ओखळल्या जाणाऱ्या शहापूरमध्ये मार्चच्या मध्यातच पिण्याच्या पाण्याची बाँब सुरू झाली आहे. हंडाभर पाण्यासाठी महिलांना उन्हातान्हात पायपीट करावी लागत आहे. मुंबई शहराला पाणीपुरवठा करणारी तानसा, भातसा, वैतरणा यासारखी मोठी धरणे तालुक्यात आहेत.

बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे 

बदलापुरातील पीडितांच्या शिक्षणाची जबाबदारी सरकारकडे

दोन्ही चिमुकल्यांच्या शिक्षण शुल्काला शासनाची मंजुरी

वडिलांच्या तक्रारीनंतर शासनाला आली जाग

शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी

शिवराज मोटेगावकरला ९ दिवसांची CBI कोठडी सुनावण्यात आली आहे

धाराशिव जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यलयात शेतकऱ्यांचा गोंधळ 

शेतकऱ्याने कार्यालयातच गळ्याला लावला फास

शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी निविष्ठा मध्ये गैरकारभार झाला त्या गैरकारभाराची चौकशी करण्याची मागणी

या अगोदर शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकाकडे केली होती निविष्ठांची मागणी,निविष्ठात गोंधळ झाल्याचा कागद द्या अधिकार्‍याकडे मागणी

अधिकाऱ्यांनी चौकशीत टाळाटाळ केल्याने शेतकरी घुसले कृषी अधीक्षक अधिकारी यांच्या मुख्य कार्यालयात

अगोदर घेतले स्वतःला कोंडून अधिकारी येत नसल्याचे पाहून शेतकऱ्यांनी अधीक्षकांच्या कार्यालयात लावला गळ्याला फास

कृषी अधीक्षक कार्यालयात मोठा गोंधळ,कृषी कर्मचारी करत आहेत शेतकऱ्यांची विनवणी,अधिकारी मात्र गैरहजर

मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन 

मनिषा मांढरेंचे मॉडर्न महाविद्यालयातून निलंबन

नीट पेपरफुटी प्रकरणी पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयाचा मोठा निर्णय

सीबीआयच्या अटकेत असणाऱ्या प्राध्यापक मनीषा मांढरे यांच्यावर संस्थेकडून निलंबनाची कारवाई

नीट पेपर फुटी प्रकरणात सीबीआयने मनीषा मांढरे यांना सी बी आय कडून अटक

मनीषा मांढरे या मॉडर्न महाविद्यालयात गेल्या 24 वर्षांपासून प्राध्यापक

पुण्यात चालत्या कारमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणात दोन आरोपी ताब्यात

महिलेवर चालत्या कारमध्ये अत्याचार प्रकरणात पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे.

प्रसिद्ध पबमध्ये पार्टी करून परतत असताना चालत्या कारमध्ये महिलेसोबत अश्लील प्रकार करत अत्याचार केल्याची घटनेत

आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे

पीडित महिलेच्या तक्रारी आणि माहितीवरून पुणे पोलिसांनी आरोपी ताब्यात घेतले आहेत

जालना जिल्ह्यात दुसऱ्या दिवशीही इंधन तुटवडा, इंधनाअभावी अनेक पेट्रोल पंप बंद...

जालना शहरासह जिल्ह्यात अनेक पेट्रोल पंपांवरती इंधन नसल्यामुळे शुकशुकाट..

इंधनाअभावी शेती कामे खोळंबली, शेतकऱ्यासह सर्वसामान्यांना फटका....

ऐन खरीप हंगामाच्या तोंडावरच इंधन संकट निर्माण झाल्याने मशागतीच्या कामांना ब्रेक लागण्याची शक्यता...

लातूरच्या RCC क्लासवर शिवसेनेकडून शाही आणि काळ ऑइल फेकलं , प्राध्यापक शिवराज मोठेगावकर विरोधात घोषणाबाजी

नीट पेपर फुटी प्रकरणात लातूर येथील RCC क्लास संचालक प्राध्यापक शिवराज मोठेगावकर यांना सीबीआयने पुण्यात ताब्यात घेतल्यानंतर, त्यांच्या लातूर येथील नालंदा आरसीसी कॅम्पस या क्लासवर शिवसेना शिंदे गटाचा कार्यकर्त्यांनी, शाही फेक करत जोरदार घोषणाबाजी केली आहे. सकाळपासून क्लासेस बाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय.

यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे नागरिक हैराण

यवतमाळमध्ये वाढत्या तापमानाने नागरिक हैराण झाले आहेत. कडक ऊन्हामुळे अंगाची लाही लाही होत असून दुपारच्या वेळेत रस्ते ओस पडताना दिसताहेत ऊन लागून चक्कर येणे, ताप आणि अशक्तपणाच्या रुग्णांमध्ये वाढ झालीये त्यामुळे आरोग्य विभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

चालत्या कारमध्ये तरुणीवर बलात्कार, आरोपी फरार; कोरेगाव पार्क पोलिसांची शोधमोहीम सुरू

  • कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन हद्दीतील घटना

  • चालत्या कारमध्ये बलात्कार करून फरार होणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू

  • पुणे पोलिसांकडून सीसीटीव्ही चेक केले जात आहेत

  • कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनमध्ये सर्व वरिष्ठ अधिकारी दाखल

पुणे एअरपोर्ट येथून दोन बांगलादेशी महिला व एका विधीसंघर्षित बालकाला घेतले ताब्यात

२ महिला व ०१ पुरुष बांगलादेशी हे पुणे एअरपोर्ट येथून गुवाहाटी,आसाम येथे पळून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली

पुणे एअरपोर्ट येथे तपास पथकातील अधिकारी कर्मचारी विमानतळ पोलीस स्टेशन रात्रगस्त यांनी पुणे एअरपोर्ट याठिकाणी सापळा रचून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या बांगलादेशींना ताब्यात घेतले

भक्तीसाठी" ओळखली जाणारी साईंची शिर्डी आता देशाच्या संरक्षण "शक्तीसाठी" सुद्धा ओळखली जाणार

जगभरातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या आणि श्रद्धा सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईंच्या शिर्डीत आता भक्ती बरोबर शक्तीचा देखील प्रत्यय येणार आहे.. शिर्डी MIDC क्षेत्रात 200 एकर जमिनीवर उभारल्या जाणाऱ्या डिस्फेन्स क्लस्टर ( तोफगोळा उत्पादन लाईन ) या प्रोजेक्टचा शुभारंभ 23 मे रोजी होणार आहे.. देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलीय..

पुण्यात दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून कोयता गँगने मुलावर केले वार

  • दारू प्यायला पैसे दिले नाही म्हणून कोयता गॅंग ने मुलावर केले वार

  • पुण्यातील कवडीपाट टोल नाका येथे सागर रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलमध्ये कोयता गॅंगने घातला राडा

  • प्रसाद दिलीप शेंडगे हा मुलगा जेवण करण्यासाठी गेला होता.या मुलाला आम्हाला दारू घेऊन दे नाहीतर आम्ही तुला सोडणार नाही अशी धमकी दिली.

  • मुलाने नकार देताच या मुलावर कोयत्याने व दारूच्या बाटल्याने मारहाण करत ठार मारण्याचा प्रयन्त केला

Pimpri Chinchwad:  पिंपरी-चिंचवडमध्ये आज अचानक इंधनाचा तुटवडा, जवळपास 80% पेट्रोल पंप बंद

आखाती देशात उगवलेला युद्ध परिस्थितीचे परिणाम आता पिंपरी चिंचवड शहरात दिसू लागले आहे. पिंपरी चिंचवड शहरातील आज जवळपास 80 टक्के पेट्रोल पंप पेट्रोल पंप चालकांनी बंद आहेत. पेट्रोल पुरवठा करणाऱ्या हिंदुस्तान पेट्रोलियम इंडियन ऑइल आणि भारत पेट्रोलियम सारख्या सरकारी कंपन्यांकडून पुरेशा प्रमाणात इंधन पुरवठा न झाल्याने, पेट्रोल पंप बंद ठेवण्याची वेळ पेट्रोल पंप मालकांवर ओढवली आहे. राज्य सरकार तसेच पेट्रोल पंप मालकांनी कोणतीही पूर्वकल्पना न देता अचानक पेट्रोल पंप बंद ठेवल्याने याचा मोठा फटका पिंपरी चिंचवड शहरातील नोकरदार आणि कामगारांना पडला आहे.

Shivsena: शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेच्या आढावा बैठकीला सुरुवात

शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदेसेनेच्या आढावा बैठकीला सुरुवात

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या नेते आणि पदाधिकाऱ्यांशी साधतायत संवाद

श्रीकांत शिंदे यांच्यासोबत मंत्री उदय सामंत, दादा भुसे आणि गुलाबराव पाटील देखील बैठकीला उपस्थित

पक्ष संघटन मजबूत करण्यासह आगामी विधानपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेतायत आढावा

सुरुवातीला देवळाली आणि इगतपुरी विधानसभा मतदारसंघाचा घेतायत आढावा

मोदींच्या आवाहनानंतर EV वाहनातून श्रीकांत शिंदे यांचा नाशिक दौरा

Kalyan: कल्याणमध्ये धक्कादायक घटना! चक्की नाका परिसरातील म्हशींचा तबेला कोसळला

कल्याण पूर्वेतील चक्की नाका परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास एक धक्कादायक घटना घडली. परिसरातील म्हशींचा तबेला अचानक कोसळल्याने एकच गोंधळ उडाला. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून तबेल्यात काम करणारे कर्मचारी आणि सर्व जनावरे सुखरूप असल्याची माहिती समोर आली आहे.

तबेला कोसळल्याने काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तत्परता दाखवत तबेल्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच जनावरांना सुरक्षित बाहेर काढले.

Sangli: इंधन दरवाढी विरोधात काँग्रेसचे पेट्रोल पंपा समोर निदर्शने

इंधन दरवाढी विरोधात सांगलीमध्ये काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले आहे.भाजप सरकारच्या विरोधात पेट्रोल पंपा समोर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या वतीने निदर्शने करत भाजपा सरकारच्या इंधन दरवाढीचा निषेध नोंदवण्यात आला आहे.काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांचे नेतृत्वाखाली शहरातील स्टेशन रोडवर निदर्शने करण्यात आली. पेट्रोलचे वाढवलेले दर कमी करावेत व इंधन पुरवठा सुरळीत ठेवावा,अशी मागणी करत,या पुढील काळात दर वाढ झाल्यास काँग्रेसकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील यावेळी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांनी दिला आहे.

नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करत छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने नांदेडमध्ये आंदोलन

नीट पेपर फुटी प्रकरणाचा निषेध करत छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने करण्यात आले नांदेड मध्ये आंदोलन.

नांदेड शहरातील वर्कशॉप कॉर्नर येथे छावा विद्यार्थी आघाडीच्या वतीने नीट पेपर फुटी प्रकरणातील कुलकर्णी आणि मोठे गावकर यांच्या फोटोला फासण्यात आली शाई.

शिक्षणाचा खाजगी कोचिंग क्लासेस ने बाजार भरवल्याचा छावा संघटनेचा आरोप.

Shivraj Motegaonkar : NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक

NEET पेपर फुटीप्रकरणी RCC क्लासचे शिवराज मोटेगावकर यांना अटक

दुपारी न्यायालयात हजर करणार

मोटेगावकर वर गुन्हा दाखल

Hingoli : पेट्रोल पंप चालकाची आडमुठी भूमिका, शेतकरी पाया पडला

हिंगोली मध्ये डिझेलचा साठा उपलब्ध असलेल्या एका पेट्रोल पंपावरती पेट्रोल पंप चालकाच्या आडमुठेपणामुळे शेतकऱ्याला पेट्रोल पंप चालकाच्या पाया पडण्याची वेळ आली आहे,

शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर गोंधळ केल्यामुळे पेट्रोल पंप चालकाने डिझेल देण्यास स्पष्ट नकार दिला आहे

अगोदर शिस्तीत उभे रहा त्यानंतरच डिझेल देऊ असं पेट्रोल पंप चालक म्हणाला आहे

Beed : अधिकमासाच्या पहिल्याच दिवशी विविध भाविकांच्या ५० तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

अधिकमासाच्या पहिल्याच दिवशी विविध भाविकांच्या ५० तोळे सोन्यावर चोरट्यांचा डल्ला

श्रीक्षेत्र पुरुषोत्तमपुरी येथील घटना

जिल्हाधिकारीच्या बैठकीत ठरलेल्या कोणत्याच बाबींची ट्रस्टीने केली नाही व्यवस्था

भाविकभक्तांना ना पिण्याचे पाणी; ना महिलांची सुरक्षितता

Gadchiroli : डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

गडचिरोली जिल्ह्यात डिझेल टंचाईने गंभीर रूप धारण केले

अनेक ठिकाणी पेट्रोल पंपांवर वाहनांच्या 2 ते 4 किलोमीटर लांबीच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मागील दोन दिवसांपासून डिझेलचा पुरवठा खंडित झाल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

Nagpur Accident News : नागपुरातील महापालिकेच्या बसचा अपघात

- नागपुरातील महापालिकेच्या आपल्या बसचा झाला अपघात

- सकाळच्या वेळी झाला इलेक्ट्रिक बसचा अपघात

- समोरून भरधाव आलेल्या कंटेनरने दिली बसला धडक

- चालक आणि वाहक जखमी झाले

- खापरीकडून बर्डीकडे येत असताना पंचशील चौकात झाला अपघात

- बसमध्ये 5 प्रवासी होते, सुदैवाने कोणीही जखमी नाही

Shivraj Motegaonkar : NEET पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात

NEET पेपर फुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकर CBI च्या ताब्यात

चौकशीसाठी घेणे ताब्यात

NEET पेपर फुटी प्रकरणी CBI च्या अटकेत असलेल्या मनीषा मांढरे यांचं होणार निलंबन

मॉडन कॉलेज प्रशासनाकडून मांढरे यांच्यावर निलंबनाची कारवाई

NEET पेपर फुटी प्रकरणी मनीषा मांढरे यांना CBI ने २ दिवसांपूर्वी केली अटक

गेल्या अनेक वर्षांपासून पुण्यातल्या मॉडर्न कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून होत्या कार्यरत

आता कॉलेज त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणार

सीबीआयचे पथक आजही लातूरमध्ये तळ ठोकून, खाजगी कोचिंग क्लासेससह काही पालकांची देखील होणार आज चौकशी

-नीट पेपर फुटी प्रकरणी लातूरमध्ये सीबीआयचे पथक तळ ठोकून आहे,

मागील चार दिवसापासून या पथकाकडून वेगवेगळ्या लोकांची चौकशी करण्यात येत आहे.

खाजगी क्लास चालकासह काही पालकांची देखील आज सीबीआयच्या पथकाकडून चौकशी करण्यात येणार

कांद्याच्या भावावरून शिवसेना ठाकरे आक्रमक

कांद्याला हमीभाव, निर्यात धोरणातील स्थिरता, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई तसेच वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारने तातडीने निर्णय घ्यावेत, यासह राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने आज वैजापूर तालुक्यातील जांबरगाव येथील समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज येथे आंदोलन करण्यात येणार आहे.

रत्नागिरी- जिल्ह्यात सीनजी सोबतच पेट्रोल डिझेलचा देखील तुटवडा

काल ऑइल कंपन्यांकडून पेट्रोल डिझेलच वितरण झालं नसल्याने इंधन तुटवडा

पेट्रोल पंप चालकांना मागणी प्रमाणे पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा नाही

त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप बंद, रत्नागिरी शहरातील मुख्य पेट्रोल पंप देखील इंधन नसल्याने बंद

रत्नागिरी जिल्ह्यात साडे पाच लाख वहाने या वाहनांना लागते चार लाख लिटरचे इंधन

सुटीचा हंगाम असल्याने ३० टक्के वाहनांच्या संख्येत वाढ

सध्या या सर्व वाहनांना साडेतीन लाख लिटर पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा

​आंबोलीत चालत्या कारवर कोसळले झाड; सुदैवाने जीवितहानी टळली

​आंबोली बांदा-संकेश्वर मार्गावरील फणसवाडी येथे एका धावत्या कारवर रस्त्यालगतचे मोठे झाड अचानक कोसळले. या भीषण अपघातात कारचे प्रचंड नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कारमधील सर्व प्रवासी सुखरूप असून मोठी जीवितहानी टळली आहे. झाड कार सह संपूर्ण रस्त्यावर पडल्यामुळे बांदा-संकेश्वर मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली. ऐन पर्यटन हंगामात ही घटना घडल्यामुळे काही क्षणांतच रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र घटनेचे गांभीर्य ओळखून आंबोली पोलीस व वन विभागाच्या टीमने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने कार मधील प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. तर कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्यात आला.

पोलिस सुरक्षेत पेट्रोल डिझेल वाटप

बुलढाणा जिल्ह्यातील निम्म्याहून अधिक पेट्रोल पंप बंद असून त्यांच्याकडे स्टॉक नसल्याचे फलक लावले आहे. . तर ज्या पंपावर पेट्रोल डिझेल उपलब्ध आहे, त्याठिकाणी मात्र वाहन चालकांची तोबा गर्दी झाल्याचे चित्र आहे .. शिवाय पंपावर वाढणाऱ्या गर्दीमुळे वाहन चालकांत नंबर लावणावरून वाद होत असल्यानं अनेक पंपावर पोलिस सुरक्षेत पेट्रोल डिझेल वाटप सुरू आहे . तर वाहनाच्या एक ते दीड किलोमीटर रांगा लागल्या आहेत .. ट्रॅक्टर ला सुद्धा डिझेल मिळत नसल्याने शेती कामे खोळंबली आहेत ....

विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादनात मोठी घट.

नांदेड जिल्ह्यात कधी ऊन तर कधी पाऊस असा खेळ सुरू आहे.त्यामुळे या बदलत्या वातावरणाचा फटका मिरची पिकाला बसला आहे. नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीची लागवड केली जाते. परंतु यंदा नांदेड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वातावरणात बदल होताना दिसत आहे. या बदलत्या वातावरणाचा मिरची पिकाला फटका बसला असून मिरचीवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे मिरची उत्पादनात मोठी घट झाली आहे.दरम्यान मिरची उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झाल आहे.

विविध रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने मिरची उत्पादनात मोठी घट. सिडनीत ‘गोंधळ व स्वराज्याचे अज्ञात शिलेदार’ कार्यक्रम उत्साहात..

ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे वास्तव्यास असलेल्या मराठी बांधवांनी ‘गोंधळ व स्वराज्याचे अज्ञात शिलेदार’ हा सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा केला. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील दिपाली कापुरे जईद यांनी घर, नोकरी आणि कुटुंब सांभाळत आपल्या पॅशनमधून हा कार्यक्रम साकारला. त्या सिडनीतील एचसीएफ इन्शुरन्स कंपनीमध्ये कार्यरत असून त्यांनी गोंधळातील नृत्यही सादर केले. ‘सह्याद्री सिडनी’ ग्रुपच्या माध्यमातून मराठी संस्कृतीचा प्रचार-प्रसार करत नव्या पिढीला महाराष्ट्राच्या इतिहासाची ओळख करून देण्याचे काम सुरू आहे. कार्यक्रमात लोकगीते, “बाई सुया घे”, “लख्ख पडला प्रकाश” आणि गोंधळ यांसारखी मराठी सादरीकरणे झाली. कार्यक्रमाची संकल्पना व संवाद निलेश डोंगरे आणि संज्योत डोंगरे यांनी केले. तसेच दिपाली कापुरे जईद या सिडनीतील मुला-मुलींना क्लासिकल व बॉलिवूड डान्सचे प्रशिक्षणही देत आहेत.

शिवसेना नेते आणि खासदार श्रीकांत शिंदे आज नाशिक दौऱ्यावर

नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत घेणार बैठक

बैठकीला मंत्री उदय सामंत आणि दादा भुसे देखील राहणार उपस्थित

नाशिकनंतर श्रीकांत शिंदे उत्तर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या जिल्ह्यात देखील जाऊन घेणार आहेत आढावा

पक्ष संघटना मजबुत करण्यासह अन्य मुद्द्यांवर शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत श्रीकांत शिंदे करणार चर्चा

आगामी जिल्हा परिषद निवडणुका संदर्भात देखील श्रीकांत शिंदे घेणार आढावा

भोंदू अशोक खरातचा आज ED कडून ताबा घेतला जाणार, सूत्रांची माहिती

अशोक खरात याला आज सिन्नर न्यायालयात हजर करणार

लैंगिक शोषण आणि फसवणूक प्रकरणात अशोक खरात गेल्या 2 महिन्यापासून आहे कोठडीत

सिन्नर मधील आर्थिक फसवणूक प्रकरणात पोलिस कोठडीत असलेल्या अशोक खरातला आज न्यायालयीन कोठडी मिळाल्यास ED घेणार अशोक खरात याचा ताबा

ED कडून खरात प्रकरणात बेनामी संपत्ती आणि मनी लाँड्रिंग संशयावरून केला जातोय स्वतंत्र तपास

अशोक खरात याच्याशी संबंधित रूपाली चाकणकर यांच्यासह अनेकांची ED ने यापूर्वी केलीय चौकशी

सांगली... काँग्रेस व मित्र पक्ष म्हणजे घुबडाची औलादी - आमदार सदाभाऊ खोत.

काँग्रेस व त्यांच्या मित्र पक्ष म्हणजे घुबडाची औलादी आहेत,या घुबड्यांनी कधी गावगाड्यातल्या आणि शेतकरयांच्या प्रश्नावर आवाज उठवला नाही,अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचत आणि सोने खरेदी करू नका,असा सल्ला दिल्यानंतर आयत खाऊना चिंता लागली आहे,ज्यांना सत्ता मिळत नाही,सत्तेची डोहाळे ज्यांना लागलेत,त्यांना चिंता लागली आहे, अशी बोचारी टीका देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी केली आहे सांगली मध्ये पार पडलेल्या आत्मनिर्भर परिषदेमध्ये ते बोलत होते.

इंधन संकट काँग्रेसचे पाप सदाभाऊ खोतांची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन बचत व सोने खरेदी न करण्याच्या सल्ल्यावरून विरोधकांकडून होणारया टीकेला आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी जाहीर सभेतून जोरदार प्रत्युत्तर दिलाय.सांगलीमध्ये रयत क्रांती संघटनेच्यावतीने आयोजित आत्मनिर्भर नागरिक,कष्टकरी,शेतकरी परिषदेतून आमदार खोत आणि पडळकरांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केलाय. आजचा इंधन संकट हे काँग्रेसचे पाप आहे, मात्र त्याची खापर नरेंद्र मोदींवर फोडली जाते,अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केली आहे,तर नरेंद्र मोदींच्यावर टीका करणाऱ्यांना अर्थमंत्री होऊन देखील ईश्वरपूर-सांगली रस्ता करता आला नाही,असा टोला आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंती पाटलांना लगावला आहे.

परभणीत उन्हाचा कहर,   तापमानाने गाठला 45.2 अंशांचा उच्चांक

परभणी जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून आज तापमानाने तब्बल 45.2 अंश सेल्सिअसचा टप्पा पार केला आहे. यंदाच्या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून अत्यावश्यक कामांशिवाय बाहेर पडणे नागरिक टाळत आहेत. वाढत्या उकाड्यामुळे बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे आणि मुख्य रस्त्यांवरही गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता आहे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी, पाणी अधिक प्रमाणात प्यावे आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

nashik-kalvan-धरणात पोहायला गेलेला तरुण बेपत्ता

नाशिकच्या कळवण तालुक्यातील चणकापूर धरण परिसरात कळवण येथील फिरायला गेलेल्या चौघे मित्रानं पैकी धनराज महाले हा धरणात पोहण्यासाठी गेला असता तो बराच वेळ पाण्यातून बाहेर न आल्याने सोबत असलेल्या मित्रांनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,मात्र त्याचा शोध लागू शकला नाही,अखेर स्थानिकांच्या मदतीने त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला,या घटनेची माहिती आभोणा पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र संध्याकाळी उशिरा पर्यंत तरुणाचा शोध लागला नव्हता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com