Congress Lok Sabha 2024 Election Strategy to Defeat BJP Saam TV
देश विदेश

Political News: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मास्टर प्लान; भाजपला पराभूत करण्यासाठी आखली मोठी रणनीती

Congress Election Strategy: आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने खास मास्टर प्लान आखल्याची माहिती आहे.

Satish Daud

Congress Lok Sabha 2024 Election Strategy

आगामी लोकसभा निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी काँग्रेस पक्षाने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी काँग्रेसने खास मास्टर प्लान आखल्याची माहिती आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच काँग्रेच्या प्रमुख नेत्यांची दिल्लीत महत्वाची बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसने मोठा प्लान आखल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काँग्रेसच्या बैठकीत मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस, प्रभारी, प्रदेशाध्यक्ष आणि राज्याच्या विधानसभांमधील नेत्यांना बोलावण्यात आले होते. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये २००४ च्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाची पुनरावृत्ती करण्याचा काँग्रेसचा मानस असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

२००४ लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसने (Congress) देशातील ६ समविचारी पक्षांसोबत आघाडी केली होती. यामध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस, आंध्र प्रदेशातील टीआरएस, तामिळनाडूमधील डीएमके, झारखंडमधील जेएमएम आणि बिहारमध्ये आरजेडी-एलजेपीसोबत आघाडी केली होती.

या आघाडीचा काँग्रेसला जबरदस्त फायदा झाला होता. निवडणुकीत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीएविरोधात काँग्रेसने मोठा विजय मिळवला होता. आघाडी केलेल्या ५ राज्यांमधील लोकसभेच्या १८८ जागांपैकी ११४ जागांवर काँग्रेसला विजय मिळाला होता. तर काँग्रेसच्या मित्रपक्षांनी ५६ जागांवर बाजी मारली होती.

दरम्यान, यावेळी देखील काँग्रेस २००४ ची रणनीती घेऊन मैदानात उतरण्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे २००३ मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये काँग्रेला पराभवाचा सामना केला होता. मात्र लोकसभा निवडणुकीत जोरदार पुनरागमन करताना पक्षाने दणदणीत विजय मिळवला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DY chandrachud : एखादा पक्ष ठरवणार का, सुप्रीम कोर्टात निर्णय काय घ्यायचा? ठाकरे गटाच्या आरोपांना चंद्रचूड यांचं प्रत्युत्तर

Saim Ayub: वनडे क्रिकेटच्या इतिहासात जे कोणालाच जमलं नाही, ते सॅम अयूबने करुन दाखवलं

Beetroot Benefits: हिवाळ्यात बीट खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहिती आहेत का?

Constitution Day : संविधान वर्तमान आणि भविष्याचे मार्गदर्शक; संविधान दिनी PM मोदींचा दहशतवाद्यांनाही कडक इशारा

Health Tips: हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने मिळतात जबरदस्त फायदे; जाणून घ्या

SCROLL FOR NEXT