Manasvi Choudhary
कोरियन स्किन केअर रूटीन सध्या सर्वत्र चर्चेत आहे. कोरियन मुली दिसायला सुंदर आणि चमकदार असतात.
कोरियन स्किनकेअर रूटीनसाठी नेमकं काय करायचे हे या वेबस्टोरीतून जाणून घेऊया.
तांदळाचे पाणी स्किनसाठी अत्यंत फायदेशीर आहे. व्हिटॅमिन ई आणि फेरूलिक अॅसिड युक्त तांदळाच्या पाण्याने चेहरा धुतल्यास त्वचा उजळण्यास मदत होते.
मध आणि साखर मिक्स करून चेहऱ्यावर हलक्या हाताने मसाज केल्याने त्वचेला फायदा होतो त्वचा चमकू लागते.
कोरफडचा गर चेहऱ्याला थंडावा देत यामुळे कोरफड आणि काकडीचा रस एकत्र करून चेहऱ्याला लावा आणि चेहरा नंतर धुवा.
ग्रीन टी बनवून तो पूर्णपणे थंड होऊ द्या. एका स्प्रे बॉटलमध्ये भरून तो चेहऱ्यावर टोनर म्हणून वापरा. ग्रीन टी मध्ये मुबलक प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट्स असतात जे त्वचेला तरुण ठेवतात.
चेहऱ्यावर कोणतेही तेल किंवा क्रीम लावताना ती नेहमी खालून वरच्या दिशेला लावावे बोटांचया टोकांनी हलके टॅप करावे.