Manasvi Choudhary
सेलिब्रिटींना घातलेले मंगळसूत्र कायमच महिलांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू असतात. पारंपारिक ते मॉडर्न अशा अनेक पॅटर्नमध्ये हे मंगळसूत्र असतात.
अनेकदा सेलिब्रिटीच्या मंगळसूत्राची चर्चा आणि ट्रेंड सुरू असतो. नाजूक आणि मॉडर्न हे मंगळसूत्र असतात.
दीपिकाने मंगळसूत्राच्या बाबतीत 'लेस इज मोर' हा ट्रेंड सेट केला. तिचं मंगळसूत्र अगदी साधं पण अत्यंत महागडं आहे.
काळ्या मण्यांच्या एका नाजूक सरामध्ये मध्यभागी एक मोठा 'सोलिटेअर डायमंड' आहे. हे मंगळसूत्र वेस्टर्न कपड्यांवर आणि साडीवरही उठून दिसतं.
आलियाचं मंगळसूत्र नाजूक आहे. काळ्या मण्यांच्या या पॅटर्नमध्ये मध्यभागी 'इन्फिनिटी' चिन्ह असते.
अभिनेत्री रूपाली भोसले हिच्या मंगळसूत्राचा ट्रेंड असतो. अत्यंत नाजूक असं हे मंगळसूत्र आहे महिला खास वेस्टर्न आणि एथनिक लूकवर हे मंगळसूत्र घालू शकतात.
कियारा अडवाणी हॅलो डायमंड पेंडंट मंगळसूत्र परिधान करते ज्यामध्ये मध्यभागी एक मोठा हिरा आणि त्याच्या बाजूला छोट्या हिऱ्यांचे वर्तुळ असते
प्रियांका चोप्रा स्टाईल नॅचरल मोईसनाइट म्हणजेच मोठ्या आकाराचे पण वजनाने हलके आणि पारदर्शक खड्यांचे मंगळसूत्र घालते.
पिवळ्या सोन्यापेक्षा 'Rose Gold' ला जास्त पसंती मिळत आहे, कारण ते हिऱ्यांसोबत अधिक ग्लॅमरस दिसते.