Sharad Mohol News: शरद मोहोळ हत्येचं धक्कादायक कारण समोर; पोलीस तपासात चक्रावून टाकणारा खुलासा

Sharad Mohol Case: शरद मोहोळ हत्या प्रकरणात पोलीस तपासात एक चक्रावणारी माहिती समोर आली आहे.
Gangster Sharad Mohol Case Updates
Gangster Sharad Mohol Case UpdatesSaam TV
Published On

Gangster Sharad Mohol Case

विद्येचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुणे शहरात शुक्रवारी (५ जानेवारी) रक्तरंजित थरार घडला. कुख्यात गुंड शरद मोहोळ यांची दिवसाढवळ्या गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या घटनेनं संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत आरोपी साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर याच्यासह ८ जणांना अटक केली आहे.  (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Gangster Sharad Mohol Case Updates
Yavatmal News: बायको माहेरी जाताच बापाने ३ वर्षांच्या बाळाला विकलं; यवतमाळमधील संतापजनक घटना

आरोपी मुन्ना याने शरद मोहोळ याची हत्या का केली? याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. दरम्यान, पोलीस तपासात एक चक्रावणारी माहिती समोर आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आरोपी मुन्नाचे शरद मोहोळसोबत मोठे वाद झाले होते.

जमिनीवरून आणि आर्थिक गोष्टीवरून दोघांमध्ये वाद झाले होते. याच वादातून आरोपी मुन्ना याने शरद मोहोळ याची हत्या करण्याचा कट रचला. कोथरुड परिसरातील सुतारदरा या ठिकाणी दुचाकीवरुन आलेल्या आरोपींनी शरद मोहळ याच्यावर तीन गोळ्या झाडल्या.

या गोळीबारात मोहोळ गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता, डॉक्टरांनी मृत घोषित केलं. दरम्यान, गोळीबाराच्या घटनेनंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली.

कोण होता शरद मोहोळ?

शरद मोहोळ हा मुळशी तालुक्यातील रहिवासी होता. त्याचे आई वडिल शेतकरी असून बेताच्या परिस्थितीत मोठा होऊनही तो गुन्हेगारीकडे वळला होता. गुन्हेगारी क्षेत्रात सुरुवातीला शरदने कुख्यात गुंड संदीप मोहोळ याचा ड्रायव्हर म्हणून काम केले. मात्र, याच संदीप मोहोळची हत्या झाल्यानंतर तो गुन्हेगार म्हणून नावारुपास आला होता. त्याच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत.

Gangster Sharad Mohol Case Updates
Rain Alert: सावधान! पुढील ४८ तासांत अवकाळी पाऊस कोसळणार, 'या' राज्यांना झोडपून काढणार; IMD कडून अलर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com