Sunil Kamble News: भाजप आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल; पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भोवलं

Mla Sunil Kamble News: पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे.
pune BJP MLA Sunil Kamble slaps police constable video viral
pune BJP MLA Sunil Kamble slaps police constable video viral Saam TV
Published On

BJP Mla Sunil Kamble News

ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर हात उचलणं भाजप आमदाराच्या चांगलचं अंगलट आलं आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल झाला आहे. बंडगार्डन पोलिसांनी शुक्रवारी रात्री हा गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आमदार कांबळे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

pune BJP MLA Sunil Kamble slaps police constable video viral
Sharad Mohol: मोठी बातमी! शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटक

भाजप आमदार  सुनील कांबळे (Sunil Kamble) यांनी एका पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. व्हिडीओ समोर येताच विरोधकांनी महायुती सरकारला धारेवर धरलं होतं. ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या अंगावर हात उचलण्याची हिंम्मत होतीच कशी, असा सवाल विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

गृहमंत्री याची दखल घेणार का? पोलिस (Police) अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी भाजप आमदार सुनील कांबळे यांच्यावर कारवाई करावी, नाहीतर पोलिसांवर तक्रार न करण्याचा दबाव ही टाकला जाऊ शकतो, असं वडेट्टीवार यांनी म्हटलं होतं. दरम्यान, यानंतर पुणे पोलिसांनी आमदार कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील ससून रुग्णालयातील बीजे मेडिकल कॉलेजमध्ये शुक्रवारी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राजकीय नेत्यांची उपस्थिती होती. भाजप आमदार सुनील कांबळे देखील कार्यक्रमाला हजर होते.

कार्यक्रम संपल्यावर पोलीस कर्मचारी शिवाजी सरक हे त्यांचे कर्तव्य बजावत असताना आमदार सुनील कांबळे यांनी सरक यांच्या कानशिलात लगावली होती. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. यानंतर विरोधकांनी देखील भाजप आणि महायुसरकार विरोधात टीका केली होती.

दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर स्पष्टीकरण देताना आमदार कांबले म्हणाले की, मी फक्त त्या व्यक्तिला ढकललं. मी कानशिलात मारली नाही. कानशिलात मारण्याचा प्रकार वेगळा असतो. माझे आयुष्य झोपडपट्टीत गेले आहे, कानशिलात कशी मारतात, हे मला चांगलं माहितीये.

pune BJP MLA Sunil Kamble slaps police constable video viral
Astrology Today: नववर्षाच्या पहिल्या शनिवारी खास योग; या ४ राशींचे व्यक्ती होणार धनवान

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com