Cockroach Janata Party Saam Tv
देश विदेश

Cockroach Janata Party चं ६ जूनला पहिलं आंदोलन, मोदी सरकारला धारेवर धरणार; कशी असणार आंदोलनाची दिशा?

Cockroach Janata Party Protest: कॉकरोच जनता पार्टीचे दिल्लीतील जंतर मंतरवर आंदोलन होणार आहे. ६ जून रोजी हे आंदोलन होणार असून या आंदोलनाची नेमकी दिशा काय असणार? हे आज पार्टीच्या प्रवक्त्यांनी सांगितले.

Priya More
  • कॉकरोच जनता पार्टीचे ६ जून रोजी आंदोलन

  • शिक्षण व्यवस्थेविरोधात दिल्लीत होणार आंदोलन

  • धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी

  • जंतर मंतर मैदानावर होणार आंदोलन

कॉकरोच जनता पार्टीची सध्या संपूर्ण देशात जोरदार चर्चा सुरू आहे. आज कॉकरोज जनता पार्टीची पहिलीच पत्रकार परिषद दिल्लीमध्ये पार पडली. दिल्लीतील जंतर मंतर मैदानावर या पार्टीकडून मोदी सरकारविरोधात येत्या ६ जून रोजी आंदोलन केले जाणार आहे. देशातील शिक्षण व्यवस्थेविरोधात आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत या पक्षाने या आंदोलनाची घोषणा केली.

कॉकरोच जनता पार्टी भारतातील भारतातील राजकीय चर्चा बदलण्यासाठी दररोज नवनवीन भूमिका घेऊन येत आहे. या पार्टीने नुकताच ३ प्रवक्त्यांची घोषणा केली. सौरभ दास, विजेता दहिया आणि अशुतोष रांका हे या पार्टीचे अधिकृत प्रवक्ते आहेत. त्यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत. ६ जून रोजीच्या आंदोलनाविषयची आपली भूमिका स्पष्ट केली आणि या आंदोलनाची दिशा देखील सांगितली. यावेळी तिघांनीही या आंदोलनामध्ये देशातील राजकीय पक्षांनी आणि तरुणांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

सामाजिक कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांनी ऑनलाइन चळवळीत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी कॉकरोच जनता पार्टीने हे पाऊल उचलले आहे. कॉकरोच जनता पार्टीच्या ३ प्रवक्त्यांनी घोषणा करताना देशातील राजकीय चर्चेला नव्याने आकार देण्याची आपली महत्त्वाकांक्षाही पुनरुच्चारित केली. नीट पेपर लीक, सीबीएसई गोंधळ, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या, उर्वरित विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे. जबाबदारी घेण्यास कुणीही तयार नाही, असे मत या प्रवक्त्यांनी व्यक्त केले.

या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितले की, ६ जूनला जंतरमंतरवर आंदोलन होणार आहे. यावेळी शांततेत मोर्चा निघेल. तरुणांनी एकत्र येत या आंदोलनात सहभागी व्हावे आणि आपल्या मागण्या समोर ठेवाव्यात. सोनम वांगचूक हे देखील या आंदोलनात सहभागी होतील.' तसंच, 'शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा. १ कोटी तरुणांच्या आयुष्यासोबत सरकारने खेळ केला आहे. नीटच्या विद्यार्थ्यांचे ऐवढं नुकसान झालं तरी देखील धर्मेंद्र प्रधान राजीनामा देत नाहीत. १ कोटी तरुणांच्या आयु्ष्यांची काही किंमत नाही आहे की नाही या सरकारला?', असा देखील सवाल त्यांनी उपस्थित केला.

या आंदोलनाची दिशा कशी असणार याबद्दल या पार्टीच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, '६ जूनला दिपके सकाळी ८ वाजता दिल्लीत येतील. तिथून वांगचूक यांच्यासह पार्लमेंट स्ट्रीट पोलिस ठाण्यात जाऊन परवानगीची मागणी करणार आहेत. ते निवेदन देणार आहेत. त्यानंतर जंतर मंतरवर जाऊन आंदोलन करतील. प्रत्येक पक्षातून सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबार जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी

Fatty liver disease: मद्यपान न करताही लिव्हर होतंय खराब? फॅटी लिव्हरच्या या सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका!

Pune : केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील धक्कादायक अपडेट, लोहगड दुर्घटनेआधीचा रोमँटिक व्हिडिओ आला समोर

Ladki Bahin Yojana: जून संपायला अवघे ६ दिवस बाकी; लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹१५०० कधी येणार? संभाव्य तारीख आली समोर

पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी काय खावे? आणि काय खाऊ नये? वाचा पूर्ण लिस्ट

SCROLL FOR NEXT