'कॉकरोच जनता पार्टी'ला आणखी एका धक्का; 1000000 सदस्य असलेल्या पक्षाची अधिकृत वेबसाइट बंद

cockroach janta party news : 'कॉकरोच जनता पार्टी'ला मोठा हादरा बसला आहे. आता पक्षाची अधिकृत वेबसाइट बंद झाली आहे.
cockroach janta party news
social media Saam tv
Published On
Summary

सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी'चं वादळ

'कॉकरोच जनता पार्टी'च्या संस्थापकाची मोदी सरकारवर मोठे आरोप

पक्षाची अधिकृत अधिकृत वेबासाइट बंद

सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या वक्तव्यानंतर सुरू झालेल्या 'कॉकरोच जनता पार्टी'ची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. संतापलेल्या लाखो तरुणांनी सोशल मीडियावर 'कॉकरोच जनता पार्टी'ला समर्थन दिलं आहे. अवघ्या ४ दिवसांत या पक्षाला सोशल मीडियावर भाजप, काँग्रेस पक्षापेक्षा अधिक समर्थन मिळालं आहे. दुसरीकडे पक्षाचा संस्थापक अभिजीत दीपके यांना थेट जीवे मारण्याची धमकी मिळाल्याची बाब देखील समोर आली आहे. धमकीसत्रानंतर आता थेट पक्षाची अधिकृत वेबासाइट बंद करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

पक्षाची अधिकृत वेबसाइट बंद केल्यानंतर अभिजीत दीपके यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. दीपके यांनी हुकूमशाही म्हणत सरकारवर टीका केली आहे. वेबसाइट बंद झाल्याची माहिती स्वत: अभिजीत दीपके यांनी दिली. अभिजीत दीपके यांनी म्हटलं की, 'केंद्र सरकारने आमची वेबसाइट बंद केली आहे. आमच्या वेबसाइटवर १० लाखांहून अधिक जणांची सदस्य नोंदणी केली होती. इतकेच नव्हे, तर वेबसाइटवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ६ लाखांहून अधिक जणांनी याचिका दाखल करण्यासाठी सही केल्यात'.

cockroach janta party news
'दिल्ली विमानतळावर उतरताच, पोलीस तुरुंगात टाकतील'; कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपकेला अटकेची भीती?

अभिजीत दीपके यांनी पुढे प्रश्न विचारला की, सरकार आमच्या पक्षाशी इतके का घाबरत आहे. सरकार झुरळांना घाबरत आहे. केंद्र सरकारच्या हुकूमशाही भूमिकेमुळे तरुणांकडून संपात व्यक्त केला जात आहे. आमचा दोष इतकाच आहे की, आम्ही चांगल्या भविष्याची मागणी करत आहेत. आम्ही तुम्हाला इतक्या सहजपणे सोडणार नाही. आम्ही आता नव्या वेबसाइटच्या शोधात आहोत. कॉकरोच मरणार नाही'.

cockroach janta party news
मोठी बातमी! 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक दीपकेंना ठार मारण्याच्या धमक्या

तत्पूर्वी, अभिजीत दीपके यांनी सकाळी खासगी आणि पक्षाचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला होता. त्यावेळी दीपके यांनी लिहिलं होतं की, 'कॉकरोच जनता पक्षावर हल्ले सुरू आहेत. आधी पक्षाचं इन्स्टाग्राम पेज हॅक करण्यात आलं. त्यानंतर माझं वैयक्तिक इन्स्टाग्राम हॅक करण्यात आलं. माझं एक्स अकाऊंट भारतात बंद करण्यात आलं आहे. त्यानंतर सुरू केलेले बॅकअॅप अकाऊंट देखील बंद करण्यात आल्याचा आरोप दीपके यांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com