

अवघ्या काही दिवसांत इन्स्टाग्रामवर दोन कोटींपेक्षा जास्त लोक जोडलेल्या कॉक्रोच जनता पार्टीची चोहोबाजूने कोंडी करण्यात येतेय. आधी एक्स अकाऊंट बंद केल्यानंतर नीट पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सुरू केलेली वेबसाईटही ब्लॉक करण्यात आलीय.
त्यामुळे सोशल मीडियाच्या दुनियेत खळबळ उडवणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीसमोरील आव्हाने दिवसेंदिवस वाढतच चाललीयेत. विशेष म्हणजे, बेरोजगार आणि तरुणाईच्या प्रश्नांसाठी उपहासात्मक पद्धतीने आवाज उठवणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीची कशी कोंडी करण्यात येतेय पाहूयात.
कॉक्रोच जनता पार्टीला मोठा प्रतिसाद मिळत असतानाच 21 मे रोजीपार्टीचं एक्स अकाऊंट बंद करण्यात आलं. तसंच, कॉक्रोच 22 मे रोजी संस्थापक अभिजीत दिपके यांचं इंस्टाग्राम अकाऊंट हॅक झालं. त्यानंतर काही तासांतच कॉक्रोच जनता पार्टीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही हॅक झाल्याचं दिपकेंच म्हणणंय. इतकंच नव्हे तर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी साईनिंग कॅम्पेन करणारी cockroachjantaparty.org. ही वेबसाईट देखील ब्लॉक करण्यात आलीय.
दुसरीकडे त्यांना फोनवरून जीव मारण्याची धमकी देणाऱ्यानं थेट स्वत:चा व्हिडिओ पाठवून आई-वडिलांनाही इजा पोहचवण्याची खुली धमकी दिली. त्यानंतर अभिजीत दिपकेंनी धमकावणाऱ्याचा व्हिडिओच एक्सवर पोस्ट केलाय.
या धमकीनंतर आता अभिजीत दिपकेंच्या छत्रपती संभाजीनगरमधील घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय. सोशल मीडिया अकाऊंट हॅक झाल्यानंतरही कॉक्रोच जनता पार्टीची तरुणाईमधील क्रेझ काही कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके या अडचणींना कसं तोंड देणार? केवळ सोशल मीडियावरच हे युद्ध लढणार की प्रत्यक्षात आयोगाकडे पक्षाची स्थापना करणार याकडे लक्ष लागलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.