

शक्तिपीठ महामार्गाला पश्चिम महाराष्ट्रात विरोध
सांगलीत महिलांनी प्रकल्पाच्या विरोधात काढला मोर्चा
विरोधकांकडून प्रकल्पाचा विरोध
पश्चिम महाराष्ट्रात होणाऱ्या प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढला आहे. राजकीय नेत्यानंतर आता जनसामान्यांकडून शक्तीपीठ महामार्गाला विरोध केला जात आहे. या प्रकल्पामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शक्तिपीठ महामार्गामुळे महारापूराच्या धोक्याला शिक्कोमार्तब होईल, अशी चिंता शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी व्यक्त केली. राजू शेट्टी यांच्यानंतर आता महिलांनी या प्रकल्पाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे.
शक्तिपीठ महामार्गावरून समर्थनार्थ व विरोधी असे दोन गट पडले आहेत. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महामार्गामुळे राज्यावर नऊ लाख कोटींचं कर्ज होणार आहे. त्यामुळे त्याचा भुर्दंड जनतेला सोसावा लागणार आहे, असं विरोधी पक्षाच्या नेत्यांचं म्हणणं आहे. या प्रकल्पाला सोलापूरनंतर सांगलीतूनही विरोध होताना दिसत आहे.
शक्तिपीठाविरोधात महिला आक्रमक
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गासाठी गावातील २८६ एकर जमीन संपादित केली जणार आहे. या प्रसल्पावरून सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कामेरी येथील महिलांनी आझ शनिवारी ग्रामपंचायतीपासून जनजागृती मोर्चा काढला. प्रकल्पाच्या विरोधात महिलांनी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या दरम्यान मोर्चा काढला. कामेरी येथून निघालेला त्यांचा मोर्चा हनुमान मंदिर, मुख्य बाजारपेठ मार्गे गावातून गेला.
महिलांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. त्यानंतर मोर्चादरम्यान "एकच जिद्द, शक्तिपीठ रद्द", "शक्तीपीठ महामार्ग रद्द झालाच पाहिजे", "जमिनी आमच्या हक्काच्या, नाही कुणाच्या बापाच्या", अशा घोषणाबाजी देत महिलांनी संपूर्ण कामेरी गाव दणाणून सोडले.
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी कामेरी गावातील सुमारे 286 एकर बागायती आणि कसदार जमीन भूसंपादनात जाणार आहे. भाजीपाला, केळी, ऊस व इतर नगदी पिके घेणारी ही जमीन गेल्यास शेकडो कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होणार असल्याने गावात तीव्र संताप आहे. 'आमची पिढ्यानपिढ्यांची जमीन आहे. ती आमच्या लेकराबाळांच्या भविष्याची शिदोरी आहे. ती आम्ही कदापि देणार नाही,' अशी भूमिका आंदोलक महिलांनी मांडली.
तत्पूर्वी, काही दिवसांपूर्वी शक्तिपीठ महामार्गाविरोधात सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आणि पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. शक्तिपीठ महामार्गाला सोलापूर जिल्ह्यातील अरण मोडनिंब पंढरपूर माळशिरस या भागातील शेतकऱ्यांनी विरोध केलाय. शक्तिपीठ महामार्गाला विरोध म्हणून माढा तालुक्यातील अरण येथे सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामध्ये शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित होणारी शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.