Uttarakhand Heavy Rain Saam Tv
देश विदेश

Uttarakhand Heavy Rain : उत्तराखंड-हिमाचलमध्ये पावसाचं रौद्ररुप; जनजीवन पूर्णत: विस्कळीत, ११ जणांचा मृत्यू तर ४४ बेपत्ता

Uttarakhand News : राजधानी दिल्लीसह उत्तराखंड-हिमाचलमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात जनजीवन विस्कळीत केलेले आहे. या आपत्तीत अनेक नागरिक बेपत्ता आहेत तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

राजधानी दिल्लीसह देशातील अनेक शहरात पावसाने संपूर्ण विध्वंस केला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही मान्सूनच्या आगमनानंतर देशाच्या मोठ्या भागात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. ता.३१ जुलै २०२४ रोजी दिल्लीत विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. आजही दिल्लीत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्याती आली आहे.

हिमाचल सह कुल्लू आणि शिमला जिल्ह्यातही ढगफुटी झाली असून या आपत्तीत सुमारे १९ लोक बेपत्ता असल्याचे वृत्त हाती आले आहे. उत्तराखंडच्या टिहरी येथील गढवालमध्येही मोठ्या प्रमाणात ढगफुटीची घटना घडली आहे त्याप्रमाणे केरळच्या वायनाजमध्येही झालेल्या भूस्खलनात (Landslide)मृतांचा आकडा साधारण २५६ वर पोहचला आहे.

कुल्लू आणि मंडीमध्ये ढगफुटीमुळे गोंधळाची परिस्थिती

हिमाचल प्रदेशातील साधारण दोन जिल्ह्यात ढगफुटीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान(damage) झाल्याचे समोर येत आहे. ढगफुटीनंतर कुल्लूच्या रामपूर विभागात समेज जवळील पॉवर प्लांट प्रकल्पातील साधारण १९ लोक बेपत्ता आहे. २० हून जास्त घरे जमीनदोस्त झाली आहेत तर अनेक वाहने पुराच्या पाण्यातून वाहून गेली आहेत तर मंडी जिल्ह्यात ढगफुटीनंतर एकाचा मृतदेह आढळून आला आहे तर बाकी नऊजण बेपत्ता आहेत. मंडी जिल्हा प्रशासनाने सध्या हवाई दलाला प्राचारण केलेले आहे शिवाय घटनास्थळी असलेले स्थानिक नागरिक मदत कार्य करत आहेत.

अनेक स्थानिक नागरिक बेपत्ता , बचावकार्यास अडथळा

या नैसर्गिक आपत्तीत हवाई दलासह एनडीआरएफचीही मोठ्या प्रमाणात मदत घेण्यात आली आहे. थलतुखोड भागात अडकलेल्या नागरिकांपर्यत पोहोचण्यास अतिशय कठीण असल्याने आता हवाई दल आणि एनडीआरएफ टीमच्या मदतीने लोकांना बाहेर काढण्यात येणार असल्याचे समजते.

झालेल्या ढगफुटीमुळे हिमाचल प्रदेशातील शिमला आणि कुल्लू जिल्ह्यातील रामपूरच्या जवळपास असलेल्या १५ ते २० भागात मोठ्या प्रमाणात नुकसाना झालेले आहे. मीडिया वृत्तानुसार,श्रीखंडच्या डोंगरावरील नैन सरोवराजवळ ढगफुटीमुळे(cloudburst) कुरपण तसेच समेळ आणि गणवी या नाल्यांनी भीषण पूर आला. शिवाय शिमला जिल्ह्यातील गणवी मार्केट आणि कुल्लू जिल्ह्यातील बागीपुल मार्केटमध्ये सध्या नाले मोठ्या प्रमाणात ओसंडून वाहत आहे, याचा परिणाम सर्व उद्धस्त झाले आहे.

घणसाळी येथेही ढगफुटीमुळे विध्वंस...अनेकांचा मृत्यू

उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या मुसळधार पावसाने जनजिवन विस्कळीत झालेले आहे. सुरुवातीस टिहरीमध्ये मुसळधार पाऊस झाला मग ढगफुटी,यामुळे तेथील दोन नागरिंकाचा मृत्यू झाला. केदारनाथ रस्त्यावरही ढगफुटी झाल्याने मुख्य राष्ट्रीय महामार्गाचा काही भाग जलमय झाला आहे. त्यामुळे केदारनाथला जाणाऱ्या पायी मार्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शिवाय रामबाडा जवळील मंदाकिनी नदीवरील दोन पूलही वाहून गेले आहेत.

पावसाचा फटका नोएडालाही

ग्रेटर नोएडामध्येही पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली आहे. यामुळे ग्रेटर नोएडामध्ये(noida) मोठ्या प्रमाणात विध्वंस निर्माण झाला आहे. ग्रेटर नोएडायेथील दादरी भागात पावसानंतर मोठी दुर्घटना झाली आहे. येथे एक भिंत कोसळल्याने दोनजणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एका महिलेस एका पुरुषाचा समावेश आहे. मुसळधार पावसानंतर अचानक भिंत कोसळल्याने हे मृत्यू झाले मात्र सध्या पोलीस घटनास्थळी पोहचले असून अधिकचा तपास सुरु आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :चंद्रकांत पाटील ७ हजार मतांनी आघाडीवर

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

Assembly Election Results : मतमोजणीला सुरुवात; पहिला कल भाजपच्या बाजूने, कोणाला मिळाली आघाडी, पाहा Video

Amruta Khanvilkar Birhtday: 'वाजले की बारा ते चंद्रा'; त्या एका निर्णयाने अमृता खानविलकरचं नशीब पालटलं

SCROLL FOR NEXT