Noida Latest News : धक्कादायक! इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून पडून विद्यार्थ्याचा मृत्यू

student ends life : उत्तर प्रदेशातील नोएडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नोएडामधील बुधवारी एका इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
uttar pradesh crime
uttar pradesh crimeSaam Tv
Published On

Noida Latest News in Marathi :

उत्तर प्रदेशातील नोएडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून धक्कादायक वृत्त हाती आलं आहे. नोएडामधील बुधवारी एका इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्याने आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. (Latest Marathi News)

विद्यार्थ्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

मिळालेल्या माहितीनुसार, १३ मार्चला सायंकाळी पाच वाजून ३० मिनिटाला एका इमारतीतून पडून एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. हा विद्यार्थी इयत्ता सातवीमधील होता. या विद्यार्थ्याने आत्महत्या केली की पडून मृत्यू झाला, याबाबतचा तपास पोलीस करत आहे.

uttar pradesh crime
Kolhapur Crime News : मद्यप्राशन करून हॉटेलमध्ये धिंगाणा, पोलीस प्रमुखांनी केलेली कारवाई चर्चेत

परिक्षेचा निकाल होता बुधवारी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी हा इयत्ता सातवीमध्ये होता. त्याने वार्षिक परिक्षा दिली होती. त्याचा परिक्षेचा निकाल बुधवारी लागणार होता. त्याचे आई-वडील संगीत विषयाचे शिक्षक आहेत.

इमारतीवरून उडी मारून संपवलं जीवन

फेब्रुवारी महिन्यातही या प्रकारची घटना घडली होती. नोएडामधील हाऊसिंग सोसायटीमधील एका व्यक्तीने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर या व्यक्तीचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठविण्यात आला. पोलीस तपासात मृत व्यक्ती मानसिक आजाराने ग्रस्त होता, असं कळालं. तसेच त्याच्यावर उपचार सुरु होते.

uttar pradesh crime
Hingoli Crime News : शासकीय कार्यालयात कर्मचाऱ्याचा चाकूने भोसकून खून, हिंगाेली पाेलिसांचा तपास सुरु

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, नोएडा सेक्टर ७५ मधील पंचशील प्रतिष्ठा हाऊसिंग सोसायटीच्या १२ व्या मजल्यावरन एकाने उडी मारून जीवन यात्रा संवपली होती. या व्यक्तीने घराच्या गॅलरीमधूनच उडी मारून जीवन संपवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com