Agra Chhatrapati Shivaji Maharaj Memorial SaamTV
देश विदेश

'आई शप्पथ, ताजमहालपेक्षाही भारी स्मारक बनवणार', आग्र्यात शिवछत्रपतींचं भव्य स्मारक उभारणार; फडणवीसांची घोषणा

CM Devendra Fadnavis on Shivaji Maharaj Memorial : औरंगजेबानं ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैद केलं होतं.

Prashant Patil

मुंबई : भविष्यात आग्रा शहर शिवस्मारकासाठी ओळखलं गेलं तर नवल वाटू देऊ नका. कारण ताजमहालपेक्षाही भारी शिवस्मारक उभारण्यात येणार आहे. कुणी केली आहे ही घोषणा? आणि कधी उभं राहणार आहे शिवरायांचं भव्य स्मारक त्यावरचा हा विशेष रिपोर्ट

आग्राच्या लाल किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांची जंयती साजरी करण्यात आली. यावेळी आग्र्यात छ त्रपतीचं स्मारक करण्याचा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलाय. ज्या जागी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं ती जागा उत्तर प्रदेश सरकारनं दिली तर त्या जागेवर भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी ताज महालपेक्षा जास्त पर्यटक छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक पाहायला येतील असा विश्वास व्यक्त केलाय.

औरंगजेबानं ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजर कैद केलं होतं. त्याच लाल महालात गेल्या ३ वर्षांपासून शिवजयंती साजरी होतेय. शिवाजी महाराजांच्या सुवर्ण इतिहासात हिंदवी स्वाभिमानाचं प्रतिक हे आग्र्यात पाहायला मिळालं. शिवछत्रपतींमुळे आगऱ्याचं नाव इतिहासात कोरलं कसं कोरलं गेलं पाहूया.

आग्र्यातच महाराजांच्या स्मारकाची घोषणा का?

मुघल बादशाह औरंगजेबानं लाल महालात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला

महाराजांनी भर कार्यक्रमात मुघल बादशाहाला सुनावलं

सैरभैर झालेल्या औरंगजेबानं महाराजानां नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले

राजा रामसिंगच्या कोठीत महाराज ९९ दिवस राहिले

छत्रपतींना ठेवण्यात आलेली कोठी आणि परिसर सध्या मीना बाझार म्हणून ओळखला जातो

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी योगी सरकारकडे ज्या ठिकाणी महाराजांना ठेवण्यात आलं त्या मीना बाजारची भव्य स्मारकासाठी मागणी केल्यानं योगी सरकार आता ही जागा देऊन महाराजांचा सन्मान करणार का हे पाहणं महत्वाचं आहे. महाराजांचं ताजमहालपेक्षा भव्य स्मारक झालं तर महाराष्ट्रासाठी यापेक्षा मोठी कौतुकाची गोष्ट नाही. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या महाराजांच्या महत्त्वाकांक्षी सागरी स्मारकाचं काय झालं? तो अजूनही जिवंत आहे की समुद्रात बुडाला असे सवाल यानिमित्तानं उपस्थित होतायत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: शाळा आहे की मसाज पार्लर! शिक्षकाने विद्यार्थिनींकडून करून घेतली बॉडी मसाज, VIDEO पाहून तुम्हालाही येईल राग

Aayush Komkar: शेवटी सूड घेतलाच! वनराजच्या अंत्यविधीला शस्त्रपूजन करत बदला घेण्याची शपथ, अन् १ वर्षाने आयुष कोमकरची हत्या

Shocking : संतापजनक! मुलाच्या हव्यासापोटी जन्मदात्याने मुलीला संपवलं; बिहार हादरलं

चांदीच्या पालखीतून निघाला पुण्याचा पहिला मानाचा कसबा गणपती|VIDEO

'...नाहीतर तुझे डोळे बाहेर काढेन' प्रसिद्ध कंटेट क्रिएटरच्या ब्लाऊजकडे पाहत राहिला, बस प्रवासात आजोबाचा प्रताप

SCROLL FOR NEXT