Today Gold Silver Price : सोनं चकाकलं तर चांदी लकाकली! दोघांनी गाठला नवा उच्चांक; 1 तोळा सोनं ₹ 90000 च्या वाटेवर, तर चांदीची किंमत..

Gold Silver Price : आज सोन्या-चांदीचा दरामध्ये तुफान वाढ झाली. सोन्याच्या किंमती आज प्रति १० ग्रॅम ५० रुपयांनी वाढल्या. तर चांदीचे दर तब्बल ७०० रुपयांनी वाढले. जाणून घ्या सोने आणि चांदीचे आजचे दर..
Today Gold Silver Price
Today Gold Silver PriceSaam Tv
Published On

सोने आणि चांदीच्या दरात कमालीची वाढ होत आहे. इंडियन इंटरनॅशनल बुलियन असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेंडमध्ये दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्यात भाव ५० रुपयांनी वाढला आणि प्रति १० ग्रॅम सोन्याची किंमत ८९,४५० या नव्या उच्चांकावर पोहोचली. बुधवारी ९९.९ टक्के शुद्ध सोन्याचा भाव ८९,४०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका होता. या दरात ५० रुपयांची वाढ होऊन प्रति १० ग्रॅम सोन्याचा दर ८९,०५० वर गेला. सोन्याच्या तुलनेमध्ये चांदीची किंमत वाढली आहे. प्रति किलोग्रॅमला चांदीची किंमत ७०० रुपयांनी वाढून १,००,३०० इतकी झाली आहे.

एचडीएफसी सिक्योरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांनी गुरुवारी सोन्याचा दराने नवा उच्चांक गाठल्याचे म्हटले. कारण डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाच्या बातम्यांमुळे सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय म्हणून लोक सोन्यामध्ये गुंतवणूक करत आहेत. ट्रम्प यांच्या धोरणामुळे जागतिक व्यापार युद्धाला तोंड फुटू शकते. तेव्हा गुतंवणूकीमुळे सोन्याचे दर वाढू शकतात अशी भीती व्यक्त केली जात असल्याचे सौमिल गांधी यांनी म्हटले.

एलकेपी सिक्योरिटीजचे उपाध्यक्ष जतिन त्रिवेदी यांनीही यावर भाष्य केले. ते म्हणाले, 'एमसीएक्समध्ये वाढीसह सोन्याचा व्यवहार सकारात्मक राहिला. कमकुवत डॉलर इंडेक्सने सोन्याच्या दरवाढीला आणखी चालना दिली आहे. यूएसकडून चालू असलेल्या दर समायोजनामुळे सोन्याची मागणी जास्त राहून अनिश्चिततेत भर पडत आहे. जागतिक स्तरावर, एप्रिल डिलिव्हरीसाठी कॉमेक्स सोन्याचे फ्युचर्स ३६.८१ डॉलर्सहून २,९७२ डॉलर्स प्रति औंस या नव्या उच्चांकावर गेले.'

Today Gold Silver Price
LIC Portfolio : शेअर बाजारात एलआयसीला ८४००० कोटींचा झटका; गुंतवणूकदारांची उडाली झोप

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चीनशी व्यापार करार करणे शक्य असल्याचे वृत्त दिल्याने सोन्याचे भाव वाढले. तसेच फेडरल रिझर्व्हने बुझवारी जानेवारीच्या धोरणाच्या बैठकीचे तपशील जाहीर केले. त्याचा आंतरराष्ट्रीय बाजारातील सराफा किंमतींवर काहीसा परिणाम झाला. आशियाच्या बाजारात कॉमेक्स चांदीचा भाव २.०८ टक्क्यांनी वाढून ३३.७३ डॉलर प्रति औंस झाला.

Today Gold Silver Price
Success Story: सासरचा विरोध, जबाबदाऱ्या अन् कठीण वाटचाल; मंजरी जरुहर यांचा आयपीएस होण्यापर्यंतचा अविस्मरणीय प्रवास

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com