LIC Portfolio : शेअर बाजारात एलआयसीला ८४००० कोटींचा झटका; गुंतवणूकदारांची उडाली झोप

LIC Portfolio update : शेअर बाजारात एलआयसीला ८४००० कोटींचा झटका बसलाय. यामुळे गुंतवणूकदारांची झोप उडाली आहे.एलआयसीचं नेमकं किती नुकसान झालं, हे जाणून घेऊयात.
LIC Portfolio
LIC Portfolio updateGoogle
Published On

LIC Portfolio : शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून पडझड पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील पडझडीमध्ये सरकारी जीवन विमा कंपनी, लाईफ इन्शुरन्स, कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला मोठा झटका बसला आहे. मागील दीड महिन्यांपासून एलआयसीच्या पोर्टफोलिओमधील शेअरच्या मूल्यात ८४००० कोटींची घसरण झाली आहे.

डिसेंबर २०२४ तिमाहीनुसार, एलआयसीच्या पोर्टफोलिओमधील लिस्टेट कंपन्यांमध्ये होल्डिंग्स वॅल्यू १४.७२ ट्रिलियन रुपये होती. त्यानंतर सध्याच्या किंमतीत घट होऊन १३.८७ ट्रिलियन झाली आहे. या अर्थ ८४,२४७ कोटी रुपये म्हणजे ५.७ टक्के मार्क-टू-मार्केट नुकसान दिसत आहे.

बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, हा अभ्यास ३३० कंपन्यांवर आधारित आहे. एलआयसीच्या डिसेंबर २०२४ तिमाहीत १ टक्क्यांहून अधिक भागिदारी आहे. या कंपन्याच्या बीएसई लिस्टेड कंपन्यांच्या एकूण मार्केट कॅपचा ६६ टक्के हिस्सा आहे.

एलआयसीचं सर्वाधिक नुकसान करणाऱ्या शेअरमध्ये आयटीसी, एलअँडटी, एसबीआयच्या शेअरचा समावेश आहे. आयटीसीने ११,८६३ कोटी रुपये, लार्सन अँड टुब्रोने ६,७१३ कोटी रुपये आणि स्टेट बँक ऑफ इंडियाने ५,६४७ कोटी रुपयांचा झटका दिला आहे. या शेअरमध्ये १० टक्क्यांहून अधिक घसरण पाहायला मिळत आहे. तर एलआयसीचे शेअर २९ टक्क्यांनी घसरले आहेत.

LIC Portfolio
Fake insurance scam Pune: LIC पॉलिसीच्या नावाखाली फसवणूक, पुण्यातून ३ जणांना ठोकल्या बेड्या

एकूण २६ कंपन्यांपैकी एलआयसीचं १००० कोटींहून अधिक रुपयांचं बाजार मूल्य घसरलं आहे. टाटा कंसल्टेंसी सर्व्हिसेस,जिओ फायन्शिअल सर्व्हिसेज, एचसीएल टेक्नोलॉजीज, जेएसडब्लू एनर्जी, अदानी पोर्ट्स अँड स्पेशल इकोनॉमिक झोन, एचडीएफसी बँक आणि आयडीबीआय बँकमध्ये एलआयसीचं बाजार मूल्य २००० कोटी ते ४००० कोटी रुपयापर्यंत घट झाली आहे.

LIC Portfolio
LIC Policy: रोज ४५ रुपये गुंतवा अन् २५ लाख मिळवा, LIC जीवन आनंद पॉलिसीत आजच गुंतवणूक करा, मिळतो जबरदस्त परतावा

प्रत्येक क्षेत्रानुसार, फायनान्समधील बँक, नॉन-बँकिग फायनान्स कंपन्या, विमा कंपन्यांचा समावेश आहे. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये एकूण मुल्यात २२ टक्क्यांची घट झाली आहे.

४००० कोटींहून अधिक नुकसान

आयटी ८,९८१ कोटी रुपये, इंन्फ्रास्ट्रक्चर ८,३१३ कोटी रुपये, वीज उत्पादन ७,१९३ कोटी रुपये, फार्मास्यूटिक्ल ४,५९१ कोटी रुपये) अन्य प्रमुख क्षेत्रांचाही समावेश आहे. यात एलआयसीचं ४००० कोटी रुपयांहून अधिकचं नुकसान झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com