
आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली सामान्य नागरीकांची फसवणूक करणाऱ्या एका कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आहे. मुंबई - पुणे रस्त्यावरील वाकडेवाडी भागात एका कॉल सेंटरवर शिवाजीनगर पोलिसांनी छापा टाकला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केलं आहे. तसेच कॉल सेंटरवर वापरण्यात येणारे वस्तू देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३५ कंपन्यांचे बनावट रबरी शिक्के, १५ मोबाईल,१५० सिम कार्ड आणि विविध बँकांची खाते पुस्तिका देखील जप्त केल्या आहेत. अधिक तपास केला असता, पोलिसांनी तीन आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्राथमिक तपासात आरोपींनी दोघांची फसवणूक केलं असल्याचं समोर आलं आहे.
या प्रकरणात पोलिसांनी शंकर कारकून पोखरकर, मेहफूज मेहबुब सिद्दीकी, आशिष रामदास मानकर या तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणाचा मुख्य सुत्रधार शंकर कारकून पोखरकर आहे. एलआयसी एजंट असल्याचं सांगत त्यानं २०२१ साली शिवाजीनगर भागातील एकाची ५ लाख रूपयांची फसवणूक केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी वारंवार वास्तव्याची ठिकाणे बदलत होता.
तांत्रिक तपासावरून शिवाजीनगर सायबर पथकातील पोलिसांनी बनावट कॉल सेंटरचा शोध घेतला. फ्यूचर ग्लोबल सर्व्हिस नावानं सुरू असलेल्या कॉल सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक जण यापूर्वी एलआयसी पॉलिसी काढून देण्याचे काम करत होता. त्यातून त्यानं एलआयसीच्या ग्राहकांची माहिती मिळवली. याच माहितीचा गैरवापर करून आरोपींनी नागरीकांशी संपर्क साधून फसवण्याचा प्रयत्न केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.