Parbhani Crime News: लाच स्वीकारताना उपनिरीक्षकास अटक, दारूविक्रीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पैशांची मागणी

Police officer: दारूविक्रीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडलंय. मनोहर चांदेकर असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
Bribe Case
Bribe CaseSaam tv
Published On

दारूविक्रीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी लाच मागणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं रंगेहाथ पकडलं आहे. ही कारवाई सेलू तालुक्यातील सिंदी येथील नंदी चौक येथे करण्यात आली आहे. मनोहर चांदेकर असे अटक करण्यात आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून, या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

सेलू तालुक्यातील सिंदी येथील नंदी चौकात एका पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नंदी चौकात बेकायदेशीर दारूविक्री सुरू होती. दारू विक्रीच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने अडीच हजार रूपयांची लाच मागितली. अडीच हजार रूपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

Bribe Case
BMC elections: आगामी BMC निवडणुकीसाठी भाजपनं कंबर कसली, उत्तम मुंबई घडवण्यासाठी आखला मोठा प्लान

लाचखोर पोलिस उपनिरीक्षक मनोहर चांदेकर (वय वर्ष ५७) हे सिंदी रेल्वे पोलिस ठाण्यात पोलिस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहेत. दारूविक्रेत्याला गुन्ह्यात अटक न करण्यासाठी त्यांनी पैशांची मागणी केली होती. यासाठी अडीच हजार रुपयांमध्ये सौदा झाला होता. पोलीस उपनिरीक्षकाने लाच घेऊन त्या व्यक्तीला नंदी चौकात बोलावून घेतलं.

Bribe Case
Budget 2025: १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट, तरी ४-८ लाख रूपयांवर कर का? संपूर्ण गणित समजून घ्या

ठरल्याप्रमाणे नंदी चौकात लाचेची रक्कम व्यक्ती पोहोचला. याआधी तक्रारदाराने याची माहिती लाचलुचपत विभागाच्या पोलिसांना दिली. लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी मनोहर चांदेकर यांना अटक करण्यासाठी सापळ रचला. पोलीस उपनिरीक्षक पैसे घेण्यासाठी पोहोचले असता, त्यांना लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या प्रकरणी मनोहर चांदेकर यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com