Budget 2025: १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर सूट, तरी ४-८ लाख रूपयांवर कर का? संपूर्ण गणित समजून घ्या

Tax-free income up to 12 lakh: अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट देण्यात आली आहे. मात्र, तुमची कमाई १२ लाख रूपयांपेक्षा जास्त असेल तर, तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSaam Tv News
Published On

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेट सादर केला आहे. या बजेटमध्ये सामान्यांसाठी दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत. अशातच नोकरदार आणि सर्वसामान्य जनतेसाठी देखील त्यांनी एक घोषणा केली आहे. निर्मला सीतारामन यांनी १२ लाख रूपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. मात्र, याचा फायदा केवळ नवीन कर प्रणाली स्वीकारणाऱ्यांनाच मिळणार आहे. या कर प्रणालीबाबात लोकांच्या मनात काही संभ्रम आहे. कारण टॅक्स स्लॅब ८ - १२ लाख रूपयांच्या उत्पन्नावर १० टक्के कर आकारण्यात येणार आहे. अशा स्थितीत प्रश्न असा निर्माण होतो की, १२ लाखांचे उत्पन्न करमुक्त कसे?

अशा प्रकारे तुम्हाला मिळेल सूट

अर्थसंकल्पात १२ लाखांपर्यंतच्या उत्पन्नाला आयकरातून सूट देण्यात आली आहे. मात्र, तुमची कमाई १२ लाख रूपयांपेक्षा जास्त असेल तर, तुम्हाला टॅक्स स्लॅबनुसार कर भरावा लागेल. एकूण ४ लाख रूपयांवर कोणताही कर लागू होणार नाही. ०-४ लाखांपर्यंतच्या इन्कमवर कोणताही कर लागू होणार नाही. मात्र, ४ लाख रूपयांवर ५% कर आकारला जाईल.

Nirmala Sitharaman
Sangli Farmer: धमकी अन् त्रासाला शेतकरी कंटाळला, संपवलं आयुष्य; मृत्यूपूर्वी केला व्हिडिओ

नोकरदार लोकांसाठी अधिक फायदे

अर्थमंत्र्यांनी असेही म्हटले की, नोकरदार लोकांना स्टँटर्ड डिडक्शनसह १२.७५ लाख रूपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही.

नवीन कर स्लॅब

१२ लाखांच्या उत्पन्नावर कर नाही

०-४ लाख रूपयांच्या उत्पन्नावर शून्य कर.

४-८ लाख रूपयांच्या उत्पन्नावर ५ टक्के कर.

८-१२ लाख रूपयांच्या उत्पन्नावर १० टक्के कर.

१२-१६ लाख रूपयांच्या उत्पन्नावर १५ टक्के कर.

१६-२० लाख रूपयांच्या उत्पन्नावर २० टक्के कर.

२०-२४ लाख रूपयांच्या उत्पन्नावर २५ टक्के कर.

२४ लाखांहून अधिक रकमेवर ३० टक्के कर.

Nirmala Sitharaman
Bhiwandi Crime News: व्याजासह पैसे परत दिले तरीही छळ, व्हिडिओ तयार करून संपवलं आयुष्य, तिघांविरोधात गुन्हा दाखल

इन्कम टॅक्स रिबेट म्हणजे काय?

इन्कम टॅक्स रिबेट म्हणजे सरकारद्वारे माफ केलेले कर. उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न ५ लाख रूपयांपर्यंत असेल, तर सरकार इन्कम टॅक्स रिबेटद्वारे १२,५०० रूपयांपर्यंतचे इन्कम टॅक्स माफ करू शकेल. अशा परिस्थितीत ५ लाख रूपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर भरावा लागणार नाही. कारण या उत्पन्न मर्यादेवरील कर सवलतीच्या श्रेणीत येते. त्यामुळे सरकार कर माफ करते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com