Bhiwandi Crime News: व्याजासह पैसे परत दिले तरीही छळ, व्हिडिओ तयार करून संपवलं आयुष्य, तिघांविरोधात गुन्हा दाखल

Personal loan tragedy: व्याजासह पैसे दिले तरीही आरोपी आणखीन पैसे उकळत असल्यामुळे एकाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. अमिन शेख असे मृत व्यक्तीचे नाव असून, ही धक्कादायक घटना भिवंडीत घडली आहे.
Crime News
Crime NewsSaam Tv
Published On

व्याजासह पैसे दिले तरीही आरोपी आणखीन पैसे उकळत असल्यामुळे एकाने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. अमिन शेख असे मृत व्यक्तीचे नाव आहे. अमीन शेख यानं तीन जणांकडून १ लाख ८० हजार रूपये घेतले होते. त्यानं ३ लाख ३० हजार रूपये व्याजासह परत केले. मात्र, जास्त पैसे उकळण्यासाठी त्याला त्रास देण्यात येत होता. त्यामुळे अमिन शेख याने विष पिऊन आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना भिवंडी तालुक्यातील महापोली येथे घडली आहे.

Crime News
Panvel Crime News: ब्रेकअप झालं, प्रेयसी दुसऱ्याशी बोलत असल्याचा संशय, प्रियकरानं थेट प्रेयसीलाच संपवलं

अमिन शेख याने ३ जणांकडून १ लाख हजार रूपये घेतले होते. व्याजासकट त्याने ३ लाख ३० रूपये परत केले. मात्र, तरीही ३ जणांकडून जास्त व्याजासाठी तगादा लावण्यात येत होता. आणखीन पैसे उकळण्यासाठी ३ जण अमिन यांना त्रास देत होते. याच त्रासाला कंटाळून अमिन याने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

Crime News
America Plane Crash: सलग दुसर्‍या दिवशी अमेरिकेत दुर्घटना, गजबजलेल्या मॉलजवळ विमान कोसळलं; VIDEO

विष प्राशन करण्यापूर्वी अमिन यानं व्हिडिओ तयार केला. नंतर व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल केला आणि विष प्राशन करून आत्महत्या केली. व्हिडिओच्या आधारे अमिनच्या भावाने गणेशपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, १ महिन्यानंतर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकाला अटक करण्यात आली असून, २ जण अद्याप फरार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com