बीडच्या केज-कळंब रोडवर एसटी बस आणि ट्रकचा अपघात
अपघातात चालक, कंडक्टरसह १३ प्रवासी जखमी
जखमींना रुग्णालयात उपचारासाठी हलवले
सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
बीडच्या केज - कळंब रोडवर उभ्या असलेल्या ट्रकला प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसची जोरदार धडक लागून भीषण अपघात घडला. या अपघातात १३ जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरु आहेत. घडलेल्या घटनेनंतर परिसरात आणि प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, केज - कळंब रोडवर साळेगाव पासून जवळ असलेल्या चिंचोली पाटी, हॉटेल लालपरी जवळ सकाळी ६:०० वाजता हा अपघात झाला. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला प्रवाशांनी भरलेल्या कोल्हापूर माजलगाव गाडीची धडक लागली. या धडकेत एसटी चालक आणि कंडक्टरसह इतर १३ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय केज येथे हलवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस हेडकॉन्स्टेबल राजू वंजारे यांनी अपघातग्रस्तांच्या उपचारासाठी तातडीने मदतीसाठी प्रयत्न केले. तसेच अपघातस्थळी पोलिस उपनिरीक्षक राकेश बनसोडे यांनी भेट दिली.
या दुर्घटनेत ड्रायव्हर आनंद गायके, कंडक्टर विष्णू तांबडे आणि प्रवासी संजय खरात, चैतन संजय खरात, भास्कर गायकवाड, आशा खरात, सचिन खरात, रोशनी खरात, भाग्यश्री गायकवाड,पायल गायकवाड, सुनिता खरात,सचिन सुरवसे, आणि वैशाली राऊत अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवित हानी झालेली नाही.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.