कृषी मंत्र्यांना २ वर्षांची शिक्षा, कोकाटेंची आमदारकी रद्द होणार? कोट्यातलं घर लाटण्यासाठी सरकारची फसवणूक

Manikrao Kokate : माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंनंतर आता विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटेही अडचणीत सापडले आहेत. ३० वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणात माणिकराव कोकाटे दोषी ठरले आहेत.
Manikrao Kokate will be sentenced 2 years
Manikrao Kokate will be sentenced 2 yearsSaamTV
Published On

नाशिक : अजित पवार गटाच्या धनंजय मुंडेंआधीच कृषीमंत्री माणिकराव कोकाटें मंत्रिपद धोक्यात आलाय. कोकाटे कशामुळे अडचणीत आले आहेत? त्यांची आमदारकी का रद्द होऊ शकते? यावरचा हा विशेष रिपोर्ट.

माजी कृषीमंत्री धनंजय मुंडेंनंतर आता विद्यमान कृषीमंत्री माणिकराव कोकाटेही अडचणीत सापडले आहेत. ३० वर्षांपूर्वीच्या जुन्या प्रकरणात माणिकराव कोकाटे दोषी ठरले आहेत. नाशिक जिल्हा न्यायलायने त्यांना सरकारची फसवणूक केल्याप्रकरणी दोन वर्षांची शिक्षा आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावलाय. त्यामुळे माणिकराव कोकाटेंची आमदारकी रद्द होण्याची शक्यता असून त्यांचं मंत्रिपद धोक्यात आलंय. नेमकं काय प्रकरण आहे ते पाहूयात.

Manikrao Kokate will be sentenced 2 years
Chhatrapati Shivaji Maharaj : 'छत्रपती शिवाजी महाराज नसते, तर माझं नाव...', भाजपच्या बड्या नेत्याचं विधान चर्चेत

काय आहे प्रकरण?

१९९५मध्ये उत्पन्नाच्या कागदपत्रांमध्ये फेरफार करुन फसवणुकीचं प्रकरण

कमी उत्पन्न दाखवून मुख्यमंत्र्यांच्या १०% कोट्यातून घर मिळवलं

तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांकडून उत्पन्नाबाबत चौकशी

चौकशीत गैरप्रकार आढळल्यानं १९९७मध्ये कोकाटेंविरोधात गुन्हा

कोकाटे,त्यांचे भाऊ दोषी असल्याचा नाशिक जिल्हा न्यायलयाचा निकाल

२ वर्षांचा कारावास आणि ५० हजारांचा दंड ठोठावण्यात आलाय

या निकालामुळे आता विरोधक आक्रमक झाले आहेत. माणिकराव कोकाटेंच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी सुरू झालीय. कोकाटेही यांनीही आपली आमदारकी आणि मंत्रिपद वाचवण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. जिल्हा न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देणार असल्याचं कोकाटेंनी सांगितलंय.

Manikrao Kokate will be sentenced 2 years
Dhananjay Munde : धनंजय मुंडेंचा मंत्रिमंडळ घोटाळा? मंत्रिमंडळाची मंजुरी न घेताच टेंडर काढले? पाहा स्पेशल रिपोर्ट

कोकाटेंपुढे काय पर्याय?

२ वर्ष किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास आमदारकी रद्द होते

जिल्हा न्यायालयाच्या निकालाला हायकोर्टात आव्हान देता येणार

हायकोर्टानं शिक्षेला स्थगिती न दिल्यास सुप्रीम कोर्टाचा पर्याय

अजित पवार गटाचे अडचणीत आलेले कोकाटे हे दुसरे मंत्री आहेत. अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडेंवर कृषीमंत्री असताना मोठे घोटाळे केल्याचा आरोप आहे. त्यांचं प्रकरण ताजं असताना आता विद्यमान कृषीमंत्रीही अडचणीत आल्यामुळे सरकारला १०० दिवस होण्यापूर्वीच विकेट पडणार की काय ? अशी चर्चा आता सुरू झालीय.

Manikrao Kokate will be sentenced 2 years
Kalyan Dombivli : ६५ अनधिकृत इमारत प्रकरणानंतरही KDMC मध्ये बेकायदा बांधकामांचे रजिस्ट्रेशन सुरूच; ठाकरे गटाचा गंभीर आरोप

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com