Former Naxalist Diwakar Passes Class 10th:  Saamtv
देश विदेश

Naxalist Diwakar 10th Pass: 'एके ४७' सोडून पेन हाती घेतला, नक्षलवादी दिवाकर झाला १० वी पास; तब्बल १४ लाखाचं होतं बक्षीस!

Gangappa Pujari

छत्तीसगड, ता. १९ मे २०२४

वाल्याचाही वाल्मिकी होतो, ही म्हण बऱ्याचदा ऐकली असेल, असाच कारनामा आता छत्तीसडमधील एका नक्षलवादी तरुणाने करुन दाखवला आहे. तब्बल १७ वर्ष गुन्हेगारी जगतात दहशत माजवल्यानंतर या तरुणाने पोलिसांना शरण जात सामान्य आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे कधीकाळी बंदुक घेऊन फिरणाऱ्या या तरुणाने हातात पेन धरत कष्ट आणि चिकाटीच्या जोरावर १०वीची परीक्षा पास होण्याचा पराक्रम केला आहे. दिवाकर असे या तरुणाचे नाव असून त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

दिवाकर हा छत्तीसडमधील कुख्यात नक्षलवादी म्हणून प्रसिद्ध होता. 17 वर्षे नक्षलवादी गटात सामील झाल्यानंतर त्याने पत्नीसह पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. त्यानंतर आता त्याने नवा विक्रम केला आहे. दिवाकरने कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. दिवाकरला 10 वीत 35 टक्के गुण मिळाले आहेत.

दिवाकर यांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. स्वत: छत्तीसगडचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनीही दिवाकर याच्याशी व्हिडिओ कॉलवर बोलून आनंद व्यक्त केला. उपमुख्यमंत्र्यांशी व्हिडिओ कॉलवर संवाद साधताना दिवाकरने सांगितले की तो दररोज ३-४ तास अभ्यास करायचा. रात्री जेवण करून 10 वाजेपर्यंत सकाळी नाश्ता करून 10-11 वाजेपर्यंत त्यानंतर दुपारी पुन्हा तो २-४ वाजेपर्यंत अभ्यास करायचा.

छत्तीसगडमधील कबीरधाम भागातील एसपी अभिषेक पल्लवही दिवाकर यांना त्यांच्या घरी भेटण्यासाठी गेले होते. विशेष म्हणजे दिवाकर यांच्यावर सरकारने तब्बल १४ लाखांचे बक्षीस ठेवले होते आणि त्यांच्या पत्नीवरही १२ लाखांचे बक्षीस ठेवले होते.

मात्र आता दोघांनीही शरणागती पत्करून वही आणि पेन हाती घेतले आहे. दिवाकरच्या म्हणण्यानुसार, नक्षलवादी म्हणून तो त्याच्याकडे एके-47 बंदूक ठेवत असे. पण आता पेनाच्या तुलनेत AK-47 ची ताकदही फिकी पडली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO : 'ही लढाई विचारधारांची'; राहुल गांधींनी सरकारवर ओढले ताशेरे

Mumbai Hit and Run Case : मुंबईत आणखी एक हिट अँड रन; चेंबूरमध्ये काँग्रेस खासदारांच्या मुलाच्या कारची दुचाकीस्वाराला धडक

Rahul Gandhi Kolhapur: राहुल गांधींचे मोहब्बत की दुकान! 'कौलारु' घरात पाहुणचार अन् दिलखुलास गप्पा; टेम्पो चालकाचे कुटुंबीय भारावले

मानला रे तुला! Duleep Trophy नंतर Irani Cup मध्येही तनुष कोटियनचा जलवा

VIDEO : खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांचा राडा, दोन गटांत तुंबळ हाणामारी, पाहा

SCROLL FOR NEXT