IT Raid Agra: चप्पल व्यापाऱ्याच्या घरी छापा, नोटांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले, पैसे मोजून मोजून दमले; ३० कोटी जप्त
IT Raid In Agra:Saamtv

IT Raid Agra: चप्पल व्यापाऱ्याच्या घरी छापा, नोटांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले, पैसे मोजून मोजून दमले; ३० कोटी जप्त

IT Raid In Agra: छापेमारीत चप्पल व्यापाऱ्याच्या घरी मिळालेले घबाड पाहून आयकर अधिकारीही चक्रावून गेले. यामध्ये तब्बल ३० कोटींची रक्कम जप्त करण्यात आली असून अद्यापही मोजणी सुरूच आहे.
Published on

आग्रा, ता. २० मे २०२४

कर चोरी केल्याच्या संशयातून आयकर विभागाने आग्रा येथील एका चप्पल व्यापाऱ्याच्या घरावर धाड टाकली. या छापेमारीत चप्पल व्यापाऱ्याच्या घरी मिळालेले घबाड पाहून आयकर अधिकारीही चक्रावून गेले. यामध्ये तब्बल ३० कोटींची रक्कम जप्त करण्यात आली असून अद्यापही मोजणी सुरूच आहे.

शनिवारी (18 मे) आग्रा येथील सुभॅश बाजार आणि ढाकरन चौकात बी. के शूज या चप्पल व्यापाऱ्याच्या घरावर छापे टाकण्यात आले. करचोरी केल्याच्या संशयातून ही छापेमारी करण्यात आली होती. यावेळी चप्पल व्यापाऱ्याचे दुकान आणि घरातून कोट्यावधींची रोकड जप्त करण्यात आली आहे. ही रक्कम जवळपास ३० कोटींच्या घरात असल्याचे सांगण्यात येत असून अद्यापही मोजणी सुरूच आहे.

या छापेमारीत अनेक महत्त्वपूर्ण कागदपत्रे हस्तगत केली. तसेच अधिका्यांना चप्पल कंपनी मालकाच्या घरात ५०० रुपयांच्या नोट्सच्या अनेक बंडल सापडले. यानंतर, बँक अधिकारी आणि कर्मचार्‍यांना नोट्स मोजण्यासाठी बोलविण्यात आले. आतापर्यंत सुमारे ३० कोटींची रोकड वसूल केली आहे.

IT Raid Agra: चप्पल व्यापाऱ्याच्या घरी छापा, नोटांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले, पैसे मोजून मोजून दमले; ३० कोटी जप्त
Arvind Kejriwal: स्वाती मालीवाल प्रकरण, अरविंद केजरीवालांच्या घरी पोहचली दिल्ली पोलिस; CCTVचा डीव्हीआर घेतला ताब्यात

आयटी विभागाने जप्त केलेल्या रकमेत फक्त ५०० रुपयांच्या नोट्स दिसतात. बेड, खुर्ची आणि खोलीच्या टेबलमध्ये सर्वत्र ५०० नोटांचे बंडल आढळून आले. दरम्यान, अद्यापही या रकमेची मोजणी सुरू आहे. एका चप्पल व्यापाऱ्याच्या घरी सापडलेले हे घबाड पाहून तपास अधिकारीही चक्रावून गेलेत.

IT Raid Agra: चप्पल व्यापाऱ्याच्या घरी छापा, नोटांचा ढीग पाहून अधिकारी चक्रावले, पैसे मोजून मोजून दमले; ३० कोटी जप्त
Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर तुफान पाऊस; निवळी घाटात साचलं पाणी, वाहतुकीला अडथळा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com