Mumbai-Goa Highway : मुंबई-गोवा महामार्गावर तुफान पाऊस; निवळी घाटात साचलं पाणी, वाहतुकीला अडथळा

Maharashtra Rain News : रत्नागिरी-मुंबई -गोवा महामार्गावर अवकाळी पावसामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. महामार्गावरील निवळी घाटात रस्त्यावर पाणी साचलं आहे.
Mumbai-Goa Highway
Mumbai-Goa HighwaySaam Digital

रत्नागिरी-मुंबई -गोवा महामार्गावर अवकाळी पावसामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. महामार्गावरील निवळी घाटात रस्त्यावर पाणी साचलं आहे. सध्या चौपदरीकरणाचं काम सध्या सुरू असल्यामुळे महामार्गावर पाणी आणि चिखल यामुळे वाहन धारकांना करावी लागतेय कसरत करावी लागत आहे. रत्नागिरीतील अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाला सुरुवात झाली होती. दरम्यान पावसामुळे रत्नागिरीत वीजपुरवठा खंडीत झाली होती.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात आज पुन्हा अवकाळी पाऊस झाला. सावंतवाडी, कुडाळ तालुक्यात पावसाची तुफान बॅटींग पहायला मिळाली. दरम्यान पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. मात्र सलग पाच ते सहा दिवस पाऊस पडत असलेल्या पावसामुळे मान्सून पूर्व शेतीची कामे खोळबंली आहेत.

लोणार तालुक्याला चक्रीवादळाचा तडाखा

आज सायंकाळी ५ च्या सुमारास लोणार तालुक्यातील अनेक गावामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या वादळी वाऱ्यामुळे बीबी, किनगाव , देवानगर, खंडाळा, वझर आघावसह अनेक गावात घरावरील टिनपत्रे तसेच देवानगर येथील जिल्हा परिषद शाळेवरील संपूर्ण टिन पत्रे उडून गेलीत. तसेच अनेक ठिकाणी महावितरणचे पोल कोसळले. तसेच अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती .

Mumbai-Goa Highway
Washim Railway : शकुंतला रेल्वेचा ट्रॅकच गेला चोरीला, घटनेने खळबळ; नेमकं काय आहे प्रकरण?

पिंपरी चिंचवड शहरात आज संध्याकाळी पुन्हा एकदा दमदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाच्या रिमझिम सरी आज पिंपरी चिंचवड शहरात पडल्या आहेत. ढगाळ वातावरण आणि अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उन्हाळ्याच्या उष्णतेपासून पिंपरी चिंचवडकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अमरावतीच्या चिखलदरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. अवकाळी पावसामुळे कांदा पिकाचं मोठं नुकसान झालं असून हवामान विभागाने विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

Mumbai-Goa Highway
Chiplun Heavy Rain : भर उन्हाळ्यात ढगफुटी सदृश्य पाऊस; चिपळून, अडरे भागात नद्या झाल्या प्रवाहित

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com