Pune Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने भलेमोठे झाड कोसळले, ५ घरे जमीनदोस्त; चिमुकलीसह वृद्ध दांपत्य जखमी

Maharashtra Unseasonal Rain Updates: शहरातील दांडेकर पुलावर झाड कोसळून पाच घरे जमिनदोस्त झाली असून एका चिमुकलीसह दांपत्य जखमी झाल्याची घटना समोर घडली आहे.
Pune Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने भलेमोठे झाड कोसळले, ५ घरे जमीनदोस्त; चिमुकलीसह वृद्ध दांपत्य जखमी
Maharashtra Unseasonal Rain Updates: Saamtv

सचिन जाधव, पुणे|ता. २० मे २०२४

पुणे शहराला कालपासून वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे, घरे पडल्याच्या मोठ्या दुर्घटनाही समोर आल्या आहेत. शहरातील दांडेकर पुलावर झाड कोसळून पाच घरे जमिनदोस्त झाली असून एका चिमुकलीसह दांपत्य जखमी झाल्याची घटना समोर घडली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यात दांडेकर पूल येथे औदुंबराचे झाड उन्मळून पडल्याने पाच घरे जमीन दोस्त झाली. या दुर्घटनेत ज्येष्ठ दाम्पत्यासह चार वर्षाची चिमुरडी ही जखमी झाली आहे.सुदैवाने या दुर्घटनेत कुठलीही जीवितहानी झाली नाही. दत्तवाडी परिसरात सुखानंद सोसायटी असून येथे हे झाड आहे.

सायंकाळी सुरू झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे किमान 25-30 वर्षे जुने असलेले हे झाड कोसळले. सोसायटीची सीमा भिंत फोडून पलीकडे असलेल्या पाच घरांवर हे झाड कोसळले. यामध्ये तेली कुटुंबाची तीन घरी होती तर खुडे कुटुंबाचे एक घर होते. सोबतच नरवीर तानाजी मंडळाची एक खोली या ठिकाणी होती.अशा पाच घरांवर हे झाड कोसळले.

Pune Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने भलेमोठे झाड कोसळले, ५ घरे जमीनदोस्त; चिमुकलीसह वृद्ध दांपत्य जखमी
Heavy Rain Alert : मान्सून अंदमानात दाखल होताच वातावरण बदललं; या भागात तुफान पाऊस कोसळणार

वसंत तेली (वय 65), वासंती तेली (वय 60), सलोनी अतुल खुडे (वय ४) असे तिघे या दुर्घटनेत जखमी झाले आहेत. तिघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करून केले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वादळ वाऱ्याच्या पावसाने लोणीकंदजवळ शेतकऱ्याच्या घरावर झाड पडल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले.

Pune Unseasonal Rain: अवकाळीच्या तडाख्याने भलेमोठे झाड कोसळले, ५ घरे जमीनदोस्त; चिमुकलीसह वृद्ध दांपत्य जखमी
Pune News: बिल्डरच्या पोरानं दोघांना चिरडलं, बड्या बापाच्या पोराला 12 तासांत जामीन

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com