Porsche car kills two in Pune:
गिरीश निकम, , साम टीव्ही प्रतिनिधी
पुण्यात बेदरकारपणे कार चालवत एका श्रीमंत बापाच्या अल्पवयीन मुलानं दोघांना चिरडलं आहे. पहाटे घडलेल्या या घटनेत दोन आयटी अभियंत्यांचा मृत्यू झाला आहे. गंभीर बाब म्हणजे दुचाकीला धडक देणाऱ्या अलिशान कारला नंबर प्लेटही नव्हती. दरम्यान अपघातातील आरोपीला 12 तासात जामीन मिळालाय.
पुण्यात ड्रंक अँड ड्राईव्ह करणाऱ्या बड्या बापाच्या पोरानं दोन आयटी इंजिनिअर्सचा बळी घेतलाय. वेदांत अग्रवाल हा तरुण मद्यधुंद अवस्थेत मध्यरात्री बेफाम अलिशान पोर्शे गाडी नेत होता. कल्याणीनगरमध्ये त्यानं बाईकवरून जाणाऱ्या अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोघांनी मागून जोरदार धडक दिली.
पुण्यात काम करणाऱ्या या दोघं इंजिनिअर्सचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर वेदांत अग्रवाल तिथून पळ काढण्याच्या तयारीत होता. मात्र घटनास्थळी असलेल्या जमावानं त्याला गाडीतून बाहेर काढलं आणि चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिलं.
मिळालेल्या माहितीनुसार, वेदांत अग्रवाल हा 17 वर्षांचा अल्पवयीन आहे. वेदांत मद्यधुंद अवस्थेत अलिशान पोर्शे गाडी चालवत होता. यात अनिश अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन आयटी इंजिनिअर्सचा बळी गेलाय. वेदांत हा पुण्यातील बिल्डर विशाल अग्रवाल यांचा मुलगा आहे. विशाल अग्रवाल यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. वेदांतला मद्य देणाऱ्यावरही गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
या ड्रंक अँड ड्राईव्ह आणि हिट अँड रनचं प्रकरण असूनही वेदांत अग्रवालची केवळ 12 तासांत जामिनावर सुटका झालीय. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे.
एज्युकेशन कॅपिटल, आयटी हब अशी ओळख असलेल्या पुणे शहराचं ड्रग्ज कनेक्शन समोर आल्यानं आधीच चिंता व्यक्त होत आहे. आता बड्या बापाच्या अल्पवयीन पोराच्या ड्रंक अँड ड्राईव्हमुळे दोघांचा बळी गेल्यानं बेफाम तरुणाईच्या बेदरकारपणाचा मुद्दा ऐरणीवर आलाय. त्यामुळे पोलिसांनी कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याची गरज व्यक्त होतेय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.