Maharashtra Politics: शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ

Sanjay Shirsat: ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी केलेला दावा खोडून काढतांना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी मोठा गौप्सस्फोट केलाय. 2014 साली युतीचं सरकार निवडून आलं. त्यावेळीच भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर केली होती.
शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ
Sanjay Shirsat On Uddhav ThackeraySaam Tv

Sanjay Shirsat On Uddhav Thackeray:

>> प्रसाद जगताप, साम टीव्ही प्रतिनिधी

ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊतांनी केलेला दावा खोडून काढतांना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाटांनी मोठा गौप्सस्फोट केलाय. 2014 साली युतीचं सरकार निवडून आलं. त्यावेळीच भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर केली होती. हे पद शिंदेंना मिळेल, म्हणून उद्धव ठाकरेंनी ती ऑफर नाकारली आणि 2014 ते 2019 पर्यंत मुख्यमंत्रीपद कुणालाच दिलं गेलं नाही, असा गौप्यस्फोट संजय शिरसाट यांनी केला.

संजय शिरसाट यांच्या या गौप्यस्फोटानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांचा वाद 2014 पासून सुरू आहे का? उद्धव ठाकरेंनी 2014 साली एकनाथ शिंदेंचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी नाकारलं होतं? उपमुख्यमंत्रीपदाला घटनाबाह्य म्हणाणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपद देण्याचं कबूल केलं होतं? असे अनेक प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ
INDIA आघाडी 300 जागा जिंकलीय, पाचव्या टप्प्याच्या मतदानाआधीच तेजस्वी यादव यांचा मोठा दावा

काय म्हणाले संजय शिरसाट?

संजय शिरसाट म्हणाले आहेत की, एकनाथ शिंदे यांच्या नावाला स्वतः उद्धव ठाकरे यांनी विरोध दर्शवल्याने शिंदे यांनी ते पद स्वीकारलं नाही आणि पाच वर्ष उपमुख्यमंत्रीपद तसेच राहिले.

पण, याच काळात आताचे मुख्यमंत्री आणि तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा उपमुख्यमंत्रीपद हे घटनाबाह्य असल्याचं बोललं होतं. असं असताना त्यांनी आणि भाजपने शिवसेनेला उपमुख्यमंत्रीपदाची ऑफर कशी दिली? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. हाच प्रश्न पत्रकाराने शिरसाटांना विचारला.

शिंदेंना उपमुख्यमंत्रीपद मिळू नये, म्हणून 2014 मध्ये ठाकरेंनी भाजपची ती ऑफर नाकारली: संजय शिरसाठ
PM मोदींनी चार टप्प्यांत 270 चा जागांचा टप्पा ओलांडला, अमित शहा यांचा दावा

यावर ते म्हणाले की, सुरुवातीच्या काळाला काही काळ उपमुख्यमंत्रीपद दिलं जावं की नाही? यावरून संभ्रम निर्माण झाला होता. मात्र 2017 मध्ये त्यांनी (भाजप) सांगितलं होतं की, आम्ही उपमुख्यमंत्रीपद देतोय. तुम्ही माणसाचं नाव द्या, त्यांचा शपथविधी करू. मात्र तरीही नाव कोणाचं द्यायचं? कारण त्यावेळीही गटनेते एकनाथ शिंदे होते. अशातच त्यांना जर उपमुख्यमंत्रीपद दिलं, तर पक्षावर त्यांची पकड मजबूत होईल आणि ती आपल्याला धोकादायक आहे. असं काही यांच्या (उद्धव ठाकरे) किचन कॅबिनेटचं म्हणणं होतं. म्हणून त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं नाही.

आता भाजपने खरंच उद्धव ठाकरेंना ही ऑफर दिली होती का? दिली असेल तर ती 2014 ला दिली होती की, 2017 ला दिली? यावर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांचं स्पष्टीकरण काय येतं? हे पाहणं महत्वांचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com