Chattisgarh Viral News Saamtv
देश विदेश

chhattisgarh News: अधिकाऱ्याचा प्रताप, शेतकऱ्यांचा संताप! IPhone साठी २१ लाख लिटर पाणी वाया घालवले; काय आहे प्रकरण?

Chhattisgarh Kanker News: अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे 1500 एकर शेताला पुरेल एवढे लाखो लिटर पाणी वाया घालवल्याचा प्रकार घडला आहे.

Gangappa Pujari

Chhattisgarh Viral News: मे महिन्याच्या कडाक्याच्या उन्हात एकीकडे लोक पाण्याच्या एका थेंबासाठी वणवण करत आहेत, तर दुसरीकडे एका अधिकाऱ्याच्या मनमानीमुळे 1500 एकर शेताला पुरेल एवढे लाखो लिटर पाणी वाया घालवल्याचा प्रकार घडला आहे. हे प्रकरण छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातील आहे.

अंतागड विधानसभा मतदारसंघातील पखंजूर भागात अन्न निरीक्षकांनी पाण्यात पडलेला दीड लाख किमतीचा मोबाईल शोधण्यासाठी २१ लाख लिटर पाणी उपसल्याचा प्रकार समोर आला आहे. काय आहे हे संपूर्ण प्रकरण, चला जाणून घेवू..

काय आहे प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, छत्तीसगडच्या कांकेर जिल्ह्यात संतापजनक प्रकार पाहायला मिळाला आहे. पंखजूरमध्ये एका अन्न निरीक्षकाचा पाण्यात पडलेला महागडा मोबाईल परत मिळवण्यासाठी लाखो लिटर धरणातील पाणी वाया घालवले आहे. एका फोनसाठी दीड हजार एकर शेतजमीन जी सिंचनाखाली आली असती तितके पाणी काढण्यात आले.

IPhone पडला धरणात...

पखंजूरमध्ये तैनात असलेले अन्न निरीक्षक राजेश विश्वास रविवारी 21 मे रोजी मित्रांसोबत परळकोट जलाशयाच्या पार्टीला गेले होते. पार्टीदरम्यान त्यांचा मोबाईल जलाशयाच्या स्केल वाईजवळ पाण्यात पडला. हा ऍपलचा आयफोन असल्याचे सांगितले जात आहे. पाण्यात पडलेला मोबाईल शोधण्यासाठी अन्न निरीक्षकांनी सोमवारी सकाळपासून 'शोध मोहिम सुरू केली.

21 लाख लिटर पाणी वाया...

अधिकाऱ्याने आधी जवळच्या गावकऱ्यांना मोबाईल शोधण्यात गुंतवले. चांगले पोहणारे उतरले. त्यानंतर फोन काढण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यानंतर ३० एचपी क्षमतेचा पंप बसवून जलाशयातील पाणी बाहेर काढण्यात आले. गेल्या तीन दिवसांपासून पाणी काढण्यासाठी पंप सुरू होता.

गेल्या सोमवार ते गुरुवारपर्यंत सलग २४ तास ३० हॉर्स पॉवर मशीनच्या दोन डिझेल पंपांमुळे सुमारे २१ लाख लिटर पाणी वाया गेले. हे पाणी दीड हजार एकर जमीन सिंचनासाठी पुरेसे होते. त्या अधिकाऱ्याच्या मोबाईलमध्ये काय होते? ज्यासाठी सिंचनासाठी वापरणारे पाणी एवढ्या प्रमाणात वाया घालवले असा प्रश्न आता विचारण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

Israel Airstrike: गाझा-युद्धविरामची चर्चा सुरू असतानाच इस्रायलचा कतरमध्ये हवाई हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Maharashtra Government: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज; रस्त्यावरून होणारी कटकटी अन् भांडणं मिटणार, शेतापर्यंत होणार रस्ता

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा भूकंप; दसऱ्यानंतर ठाकरे गट फुटणार? VIDEO

SCROLL FOR NEXT