Chandrayaan-3 Update
Chandrayaan-3 Update  Saam TV
देश विदेश

Chandrayaan-3 Explainer : चांद्रयान ३ ची दक्षिण ध्रुवावरच लँडिंग का?

साम न्यूज नेटवर्क

Mission Chandrayaan 3:

चांद्रयान-3 (Chandrayaan 3 ) दक्षिण ध्रुवावरच लॅन्ड का करायचंय? असा प्रश्नही विचारला जातोय. त्याचं उत्तर या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चंद्रावरील दक्षिण ध्रुव सगळ्या खगोलप्रेमींसाठी फार कुतूहलाचा विषय का बनलाय? चांद्रयान याच दक्षिण ध्रुवावर का उतरणार आहे? आणि दक्षिण ध्रुवावरचं लॅन्डिंग का महत्त्वाचंय.. ते जाणून घेऊयात...

चांद्रयान-3चं लॅन्डर सध्या चंद्रापासून अवघ्या 25-30 किलोमीटर अंतरावर घिरट्या घालतंय. चांद्रयान 3 च्या लॅन्डर मॉड्यूलशी संपर्कही साधला जातोय. प्रतिक्षा आता फक्त या लॅन्डरच्या लॅन्डिंगचीच आहे. जर हे लॅन्डिंग सक्सेसफुल झालं, तर भारत हा चंद्रावर यान उतरवणारा जगातला चौथा यशस्वी देश बनेल. शिवाय चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सक्सेसफुल लॅन्डिंग करणारा पहिला देशही बनेल.

आता काही प्रश्न...

चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरच चांद्रयान 3 का लॅन्ड होणार आहे? दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव यात काय फरक आहे? लॅन्डिंगसाठी चंद्रावरील दक्षिण ध्रुवाला जास्त पसंती का दिली जाते? मून मिशन वाढण्याची कारणं काय आहेत..? तेही जाणून घेऊयात..

दक्षिण ध्रुवावरच का लॅन्डिंग?

गेल्या काही काळापासून चंद्रावरचा दक्षिण ध्रुव हा जगभरातील अंतराळाचा अभ्यास करणाऱ्या सगळ्यांसाठीच कुतूहलाचा विषय बनलाय. आणि या कुतुहलामागे एक विशेष कारणही आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फ जमलेला असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे दक्षिण ध्रुवावर लॅन्डिंग करणं, याला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. शिवाय याचा उपयोग चंद्रावर थांबण्यासाठी, संशोधन करण्यासाठी... आणि जगण्यासाठी आवश्यक सामग्री पुरवण्यासाठी होऊ शकतो, असाही एक निष्कर्ष जाणकार काढत आहेत.

भारताचं टार्गेट हे चंद्राच्या दक्षिण ध्रुवाच्या जवळ उतरण्याचं आहे. लॅन्डिंगसाठीची ही जागा भूमध्य रेषेपासून 69 डिग्री दक्षिणेत आहे. खरंतर या भागाला ध्रुवीय मानलं जात नाही. पण प्रकाशाची उपलब्धता, संचार आणि नेविगेट करण्यासाठी सोपं जावं म्हणून लॅन्डिंगसाठी ही जागा अनुकूल मानली जाते.

क्लाईव नील नावाच्या एका चंद्राच्या अभ्यासकानं आताच्या होणाऱ्या चांद्रयानाच्या लॅन्डिंगबाबत काही महत्त्वाच्या नोंदी सांगितल्या आहेत. आता चांद्रयान3 जिथं लॅन्डिंग करणार आहे, ते ध्रुवीय स्थान नसलं तरी ते एक उच्च अक्षांश स्थान आहे. याआधी अशाप्रकारे चंद्रावरील उच्च अक्षांशावरील ठिकाणांची पाहणी आणि त्याचा अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळेच चांद्रयाना3चं आताचं मिशन हे फार महत्त्वाचं मानलं जातंय. यामुळे पहिल्यांदाच चंद्रावरच्या नव्या ठिकाणाचा डेटा हा माणसाच्या हाती लागणार आहे. त्यामुळेच चांद्रयान 3 चं सॉफ्ट लॅन्डिंग हा फार कळीचा मुद्दा ठरणार आहे.

पाण्याच्या शोध घेण्यासाठी खटाटोप..?

चंद्रावर पाणी आहे का, याचा शोध घेण्यासाठी चंद्रावर विशेष मोहीम राबवली जात असल्याचंही जाणकार सांगतात. पण खरंतर आता जिथे चांद्रयान उतरणार आहे, तिथे तापमान पृथ्वीच्या तुलनेत कमी असण्याची शक्यताय. शिवाय सूर्याच्या ज्या कोनात चंद्र आहे, त्यानुसार दक्षिण ध्रुवावर बहुतांश वेळ सावली आहे. त्यामुळे चंद्राचा पृष्ठभाग उष्ण राहण्यासाठी कोणत्याही प्रकारचं अनुकूल वातावरण नाही. शिवाय चंद्रावर जे खड्डे आहेत, त्याच्या वरील बाजूवरच सूर्यप्रकाश पडतो.

चंद्रावरील खड्ड्यांना क्रेटर असं म्हणतात. हे क्रेटर सूर्यमंडळात -248 सल्सिअस पेक्षाही कमी तापमान असलेले असतात. एवढ्या कमी तापमानात असलेल्या क्रेटरमध्ये पाण्याचा बर्फ जमल्याची शंका घेतली जाते. आणि या क्रेटरमधली काही बर्फ हा उपयोगी असण्याचीही शक्यता व्यक्त केली जातेय.

चंद्रावरील एक रात्र पृथ्वीच्या 14 दिवसांएवढी मोठी का?

चंद्राला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 28 दिवस लागतात. ही प्रदक्षिणा लावताना चंद्राची एक बाजू ही नेहमीच पृथ्वीच्या दिशेने असते. थोडक्यात काय तर एकूण 14 दिवस चंद्राची एक बाजू ही प्रदक्षिणेदरम्यान पृथ्वीच्या समोर राहते. त्यामुळे चंद्रावरची एक रात्र ही पृथ्वीवरच्या 14 दिवसांइतकी मोठी असते.

काही जाणकारांच्या मते, चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाचं प्रमाण जास्तंय. हा बर्फ एक प्रकारची संपत्ती असल्याप्रमाणेच आहे. 1990च्या दशकात अनेक मूनमिशन हे दक्षिण ध्रुवावर केंद्रीत होते. या मिशन्समुळे भविष्यात दक्षिण ध्रुव हा लॅन्डिंगसाठीचा महत्त्वाचा दुवा मानला जात असल्याचंही बोललं जातं.

अंतराळाबाबत अभ्यास करणारे काही जाणकार सांगतात की चंद्रावरील ध्रुव हे जवळपास सारखेच आहे. दोघांमध्ये उंच भूभाग आणि ओबडधोबड पृष्ठभाग आहे. यात क्रेटर म्हणजेच खड्डेही भरपूर आहेत. ज्वालामुखी आणि धुमकेतू पडून जो खड्डा चंद्राच्या पृष्ठभागावर तयार होतो, त्याला क्रेटर असं म्हणतात. चंद्राच्या ध्रुवावर अशीही काही ठिकाणं आहेत, ज्यावर नेहमी ऊन असतं. शिवाय दोन्ही ध्रुवांवरील अंतरही लहान आहे.

चंद्रावरील दक्षिण ध्रुव हा तुलनेने कमी थंड आहे. शिवाय या ध्रुवावर अंधारही तुलनेने कमी असतो. उदाहरणार्थ.. शेकलटन क्रेटरजवळ एक भाग आहे, जिथे बराचवेळ सूर्यप्रकाश असतो. पृथ्वीच्या तुलनेत जर बोलायचं झालं, तर या ठिकाणी 200 पेक्षा जास्त दिवस प्रकाश असतो. सतत असणारा सूर्यप्रकाश हा मूनमिशनसाठी एक प्रकारचा वरदानच असतो. सोलारवर चालणारी मूनमिशनमधील मशिन्सला याचा फायदा होतो, असंही जाणकार सांगतात. चांद्रयान 3चा लॅंडरही सूर्यप्रकाशाच्या ऊर्जेतून काम करणार आहे.

भविष्यात मूनमिशनसाठी चंद्रावरील बर्फ एक महत्त्वाचा सोर्स मानला जातोय. चंद्रावरील दोन्ही ध्रुवांवर बर्फ असल्याची दाट शक्यता वर्तवण्यात आलीय. दक्षिण ध्रुवावरील सावली आणि थंड तापमानाचं क्षेत्र जास्तय. त्यामुळे दक्षिण ध्रुवावरील पाण्याचा बर्फ जास्त असणं फायदेशीर ठरु शकतं, असंही जाणकारांना वाटतंय.

ऐटकेन बेसिन..

चंद्रावरील सर्वात जुना क्रेटर म्हणजेच सर्वात जुना आणि मोठा खड्डा म्हणून ऐटकेन बेसिन ओळखला जातो. हा जुना क्रेटर म्हणजेच ऐटकेन बेसिन हा दक्षिण ध्रुवावरच आहे. हा क्रेटर दक्षिण ध्रुवाचं भौगोलिक रुप अधिक इंटरेस्टिंग बनवतो. चंद्रावर बर्फ आहे की नाही, हे याच भौगोलिक रुपामुळे उत्तर ध्रुवापेक्षा दक्षिण ध्रुवावर अभ्यासणं यात वैज्ञानिकांना जास्त आशा वाटतेय.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Facts About Kingfisher: किंगफिशर बद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला करतील आश्चर्यचकित

Sachin Tendulkar: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने बजावला मतदानाचा हक्क! मतदानाचं महत्व पटवून देत म्हणाला...

Lychee Side Effects: मधुमेह असणाऱ्यांनी लिची का खाऊ नये?

Face Serum at Home : घरच्याघरी बनवा इफेक्टीव Face Serum; कमी खर्चात येईल सेलिब्रीटी सारखा ग्लो

Farmer Success Story : चवळी लागवडीतून शेतकऱ्याला भरघोस उत्पन्न; बिलोली येथील शेतकऱ्याचे योग्य नियोजन

SCROLL FOR NEXT