Kajol: लग्नाचीही एक्सपायरी डेट असली पाहिजे...; काजोलच्या वक्तव्यावर नेटकरी चिडले; म्हणाले, त्याला घटस्फोट...

Kajol: 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' च्या नवीन भागात, काजोल म्हणाली की तिला वाटते की लग्नाही एक्सपायरी डेट असली पाहिजे. पण ट्विंकल काजोलशी सहमत नव्हती. या वक्तव्यामुळे काजोल ट्रोल करण्यात येत आहे.
Kajol
KajolSaam Tv
Published On

Kajol Trolled On social Media : प्राइम व्हिडिओच्या चॅट शो 'टू मच विथ काजोल अँड ट्विंकल' च्या नवीन भागात कृती सॅनन आणि विकी कौशल पाहुणे म्हणून उपस्थित होते. "दिस अँड दॅट" या सेगमेंट दरम्यान, लग्नांचे नूतनीकरण व्हावे किंवा एक्सपायरी डेट असली पाहिजे का असा प्रश्न विचारण्यात आला. काजोलने हो असे उत्तर दिले. पण, ट्विंकल खन्नाने या गोष्टीला नकारले.

लग्नाला एक्सपायरी डेट असली पाहिजे का? या प्रश्नाच्या उत्तरात ट्विंकल खन्ना, विकी कौशल आणि कृती सॅनन नाही म्हणाल्या आणि लाल बॉक्समध्ये उभ्या राहिल्या. पण, काजोलने हो म्हटले आणि हिरव्या बॉक्समध्ये उभी राहिली. यावर ट्विंकलने उत्तर दिले, "नाही, हे लग्न आहे, वॉशिंग मशीन नाही ज्याची मुदतवाढ आणि एक्सपायरी डेट असावी."

Kajol
Rashmika-Vijay: 'प्रत्येकाच्या आयुष्यात विजय असावा...'; लग्नाच्या चर्चांमध्ये विजयने केलं रश्मिकाला किस, पाहा व्हायरल VIDEO

काजोलने उत्तर दिले

काजोल म्हणाली, "तुम्ही योग्य वेळी योग्य व्यक्तीशी लग्न कराल याची काय हमी आहे? एक्सपायरी डेट असेल तर कोणालाही जास्त काळ सहन करावे लागणार नाही." दरम्यान, विकी कौशलने काजोलच्या उत्तरावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, "नाही, जर तुम्ही लग्न केलं आहे तर, ते निभावन तुमचं काम आहे."

Kajol
Sarara Suits: लग्नसराईसाठी लेहेंगा किंवा ड्रेसपेक्षा ट्राय करा क्लासिक शरारा सूट, दिसाल ग्लॅमरस आणि हटके

सोशल मीडिया नेटकरी काय म्हणाले?

काजोलच्या विधानावर सोशल मीडियावर मतभेद दिसून आले. काहींनी काजोलचे कौतुक केले आणि ती अगदी बरोबर असल्याचे म्हटले. एका नेटकऱ्याने लिहिले, "याला घटस्फोट म्हणतात, काजोल. हा प्रश्न का विचारला गेला?" दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले, "एक्सपायरी डेट तुमच्यावर अवलंबून आहे. जर तुम्ही आनंदी नसाल तर घटस्फोट घ्या."

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com