Sana Khan Case Update: सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला अटक, नागपूर पोलिसांनी काँग्रेसच्या आमदाराला पाठवला समन्स

One More Arrested By Nagpur Police In Sana Khan Case: सना खान यांच्या हत्येनंतर आरोपीला मदत केल्याप्रकरणी रवि शंकर यादवला अटक केली आहे.
Nagpur Crime News Sana Khan Case
Nagpur Crime News Sana Khan Case Saam TV
Published On

संजय डाफ, नागपूर

Sana Khan Murder Case Update: नागपूर (Nagpur) येथील भाजपच्या महिला पदाधिकारी सना खान हत्या प्रकरणात (Sana Khan Case) पोलिसांनी आणखी एकाला ताब्यात घेतलं आहे. या हत्याकांड प्रकरणाचा नागपूर पोलिसांकडून (Nagpur Police) कसून तपास सुरु आहे. सना खान यांच्या हत्येनंतर आरोपीला मदत केल्याप्रकरणी रवि शंकर यादवला अटक केली आहे.

तसंच याप्रकरणी नागपूर पोलिसांनी मध्य प्रदेशमधील काँग्रेस आमदार संजय शर्मा (Congress MLA Sanjay Sharma) यांना समन्स पाठवले आहे. तसंच त्यांना उद्या चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

Nagpur Crime News Sana Khan Case
Maharashtra Politics: 'शरद पवारांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली; तुम्ही काय केलं?' राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

मिळालेल्या माहितीनुसार, सना खान हत्या प्रकरणात आणखी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. सना खान यांच्या हत्येनंतर आरोपीला मदत केल्याप्रकरणी अखिलेश पटेलनंतर रवि शंकर यादवला पोलिसांनी अटक केली आहे. अखिलेश पटेल, रविशंकर यादव आणि काँग्रेसचे आमदार संजय शर्मा यांनी आरोपींचे मोबाईल लपवण्यासाठी मदत केली होती.

Nagpur Crime News Sana Khan Case
MNS Tweet On Ravindra Chavan: 'झोपेचं सोंग घेऊन जबाबदारी झटकणाऱ्यांना...', मुंबई-गोवा महामार्गावरुन मनसेचे रविंद्र चव्हाणांना प्रत्युत्तर

सना खान हत्या प्रकरणाचा तपास करणाऱ्या नागपूर पोलिसांनी मध्यप्रदेशमधील काँग्रेस आमदार संजय शर्मा यांना नागपूर पोलिसांनी समन्स पाठवले आहे. तसंच त्यांना उद्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितले आहे. संजय शर्मा यांच्यावर आरोपीला हत्येनंतर मदत केल्याचा ठपका आहे.

Nagpur Crime News Sana Khan Case
Devendra Fadnavis:... अन् तेव्हापासून डॉ. आंबेडकर जयंती साजरी केली जाते; जपानच्या कोयासन विद्यापीठाकडून देवेंद्र फडणवीसांचे आभार

दरम्यान, सना खान हत्या प्रकरणात नागपूर पोलिसांनी आतापर्यंत ५ आरोपींना अटक केली आहे. या पाचही आरोपींची २५ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. तर, सना खान यांची हत्या झाल्यासंदर्भात काही पुरावे सापडले असल्याने सना खान यांची हत्या झाली नाही या चर्चेत काही तथ्य नसल्याचे नागपूर पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी सांगितले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com