Maharashtra Politics: 'शरद पवारांनी कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली; तुम्ही काय केलं?' राष्ट्रवादीचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

Maharashtra Politics: शरद पवारांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली; तुम्ही काय केलं? असा सवाल राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना केला आहे.
sharad pawar and eknath shinde
sharad pawar and eknath shinde saam tv

Maharashtra Political News:

केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू केल्यानंतर शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात केंद्र सरकारने २ लाख मेट्रिक टन कांदा खरेदीचा निर्णय घेतला आहे. यावरून विरोधकांना सरकारला घेरलं आहे. मात्र, या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. त्याला राष्ट्रवादीने प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवारांनी कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांची कर्जमाफी केली; तुम्ही काय केलं? असा सवाल राष्ट्रवादीने मुख्यमंत्र्यांना केला आहे. (Latest Marathi News)

केंद्र सरकारच्या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून मुख्यमंत्र्यांनी शरद पवारांना लक्ष्य केलं. 'शरद पवार मोठे नेते आहेत. शरद पवार साहेबही १० वर्ष कृषिमंत्री होते. त्यावेळीही शेतकऱ्यांबाबत अशी परिस्थिती उद्भवली होती, तेव्हा असा निर्णय कधी घेतला गेला नाही. काही सूचना असतील तर त्यांनी सरकारला कराव्यात, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं.

sharad pawar and eknath shinde
Amruta Fadnavis: 'देवेंद्रजी पहिल्यापासून डॉक्टर, पण...'; उपमुख्यमंत्र्यांना डॉक्टरेट पदवी जाहीर झाल्यानंतर अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांद्याच्या प्रश्नावरून शरद पवारांच्या कृषिमंत्रीपदाचा कार्यकाळावर बोट ठेवल्याने राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी जोरदार उत्तर दिलं आहे.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले, ' गेल्या काही दिवसापासून कांद्याचे प्रश्न चिघळला आहे. कांदा निर्यातीवर 40% निर्यात शुल्क केंद्र सरकारने लादले. त्यामुळे उत्पादकांवर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व पवार साहेब हे नेहमीच शेतकऱ्यांच्या मदतीला धावून जाणारे असल्यामुळे शेतकऱ्यांच्या आंदोलनाला राष्ट्रवादी पक्षाने पाठिंबा जाहीर केला'.

sharad pawar and eknath shinde
MNS Tweet On Ravindra Chavan: 'झोपेचं सोंग घेऊन जबाबदारी झटकणाऱ्यांना...', मुंबई-गोवा महामार्गावरुन मनसेचे रविंद्र चव्हाणांना प्रत्युत्तर

'तीन-चार महिने कांदा खाऊ नका, असा सल्ला देणारे मंत्रीही विद्यमान सरकारमध्ये आहेत,असे तपासे म्हणाले.

'केंद्र सरकारने जाहीर केलेल्या ₹2410 प्रतिक्विंटल कांदा खरेदी दर हा अपुरा आहे, अशी खोचक टीकाही राष्ट्रवादीचे प्रवक्ते तपासे यांनी केली. अडचणीच्या काळात शेतकऱ्याला चार हजार रुपये प्रति क्विंटल द्यायला हवे होते, अशी मागणी तपासे यांनी पुढे केली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com