सूरज मसुरकर
राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जपानमधील कोयासन विद्यापीठाकडून मानद डॉक्टरेट पदवी जाहीर झाली आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवीचा मान मिळाला आहे. देवेंद्र फडणवीसांना डॉक्टरेट पदवी जाहीर झाल्यानंतर त्यांची पत्नी अमृता फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)
अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघ आणि भाजप जैन प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने कँसरमुक्त महाराष्ट्र अभियानाची सुरुवात आज झाली.
या अभियानासाठी नरिमन पॉईंट येथील भाजप प्रदेश कार्यालयात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होत्या. यावेळी अमृता फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
देवेंद्र फडणवीस यांना मानद डॉक्टरेट पदवी जाहीर झाल्यानंतर त्यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. अमृता फडणवीस म्हणाल्या, 'देवेंद्र फडणवीस यांना आता मान्यता मिळाली आहे. मात्र, देवेंद्रजी पहिल्यापासून डॉक्टर आहेत. ते पॉलिटिकल डॉक्टर आहेत. मला लग्न झाल्यापासून माहिती आहे'.
कँसरमुक्त महाराष्ट्र अभियानाविषयी सांगताना म्हणाल्या, '४ फेब्रुवारी २०२२ रोजी पहिला टप्पा सुरु केला. अखिल भारतीय जैन महासंघाने सुरु केला. अनेक शिबिरे झाली. आता दुसरा टप्पा सुरु होतोय. ५० हजार लोकांना या उपक्रमात सामील करून घेण्यात येईल'.
'कर्करोगमुक्त होण्यासाठी कशी जीवनशैली असावी, यावर लोकांना माहिती द्यावी यामध्ये तन मन धन अशा कुठल्याही प्रकारे मदत लागली, तर मी तत्पर असेल. ब्रॅन्ड अम्बेसिडर म्हणून माझा चेहरा तुम्ही घ्या, आपल्याला महाराष्ट्र कर्करोगमुक्त करायचा आहे, त्यासाठी लागेल तिथे मी उपस्थित असेल, अशाही त्या म्हणाल्या.
चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना डॉक्टरेट पदवी जाहीर झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, 'आज देवेंद्र फडणवीस यांना मानद डाँक्टेरट पदवी जाहीर झाली.देवेंद्र फडणवीस यांनी एक स्वप्न पाहिले की, महाराष्ट्र कॅन्सरमुक्त झाला पाहिजे. फडणवीस यांच्या वडिलांचे निधन कँन्सरने झाले, तेव्हा त्यांनी ठरवले की, हा आजार मी महाराष्ट्रातून घालवून टाकेल. त्यांनी आता सुरूवात केली आहे'.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.